आगामी अॅशेसमध्ये इंग्लंडचा 5-0 धुव्वा, मॅकग्राची भविष्यवाणी
दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने अॅशेस मालिकेपूर्वी पुन्हा एकदा धाडसी भविष्यवाणी केली आहे. 2025-26 च्या मालिकेत ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा 5-0 असा धुव्वा उडवेल, असा त्याचा विश्वास आहे. ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा लाभ उठवत ऑस्ट्रेलियाचा स्थिर संघ बेन स्टोक्सच्या इंग्लंडपेक्षा खूपच वरचढ ठरणार असेही मत त्याने बोलून दाखवलेय.
मॅकग्रा म्हणाला, मी क्वचितच भविष्यवाणी करतो, बरोबर? आणि मी यावेळीही वेगळी भविष्यवाणी करणार नाही – 5-0. 21 नोव्हेंबरपासून सुरू होणारी पाच सामन्यांची मालिका नवी जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्रातील ऑस्ट्रेलियाचा पहिला मायदेशातील दौरा असेल. इंग्लंड मात्र निराशाजनक विक्रमासह ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहे. 2010-11 मध्ये स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली 3-1 ने मिळवलेल्या विजयापासून इंग्लंडने ऑस्ट्रेलियात एकाही कसोटीत विजय मिळवलेला नाही. त्यानंतर त्यांना दोनदा व्हाईटवॉशचा (2006-07, 2013-14) आणि 2017-18 मध्ये 4-0 पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Comments are closed.