पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्री मेगाब्लॉक, अंधेरी ते चर्चगेटदरम्यान लोकल वाहतुकीत बदल
पश्चिम रेल्वे मार्गावर देखभाल व दुरुस्ती कामासाठी शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान मध्यरात्री 12 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करून अंधेरी ते चर्चगेटदरम्यान जलद गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पश्चिम रेल्वेवरील ट्रक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी शनिवारी रात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सांताक्रुझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत तसेच डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील गाडय़ा अंधेरी आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
Comments are closed.