ना राजस्थान, ना चेन्नई, संजू सॅमसन पुढचं आयपीएल तिसऱ्याचं संघाकडून खेळणार, आकाश चोप्राचा अंदाज

नवी दिल्ली: आयपीएल 2026 संदर्भातील तर्क वितर्क आतापासून सुरु झाले आहेत. एकीकडे आर. अश्विन यानं चेन्नई सुपर किंग्जची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन कधी चेन्नईकडे जाणार, कधी तो राजस्थानसोबत राहणार अशा चर्चा सुरु आहेत मात्र, भारताचा माजी कसोटीपटू आणि कमेंटटेर आकाश चोप्रानं मोठा दावा केला आहे. संजू सॅमसन शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्समध्ये देखील जाऊ शकतो, असं चोप्रानं म्हटलंय. आकाश चोप्रानं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताा म्हटलं की संजू सॅमसनला संघात सहभागी करुन घेण्याबाबत केकेआर विचार करु शकतं.

संजू सॅमसन कोणत्या संघाकडून खेळणार?

काही मीडिया रिपोर्टसनुसार संजू सॅमनस यानं स्वत:हून राजस्थान रॉयल्सची साथ सोडण्याचा निर्णय घेतला होता. सॅमसन अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांना भेटला होता. तेव्हापासून तो चेन्नईकडे जाईल अशा चर्चा सुरु होत्या.

आकाश चोप्रानं  संजू सॅमसनच्या टीम चेंज करण्याबाबत विचार केला असता तो चेन्नई ऐवजी केकेआरकडे जाऊ शकतो, असं म्हटलं. सध्या केकेआर कोणताही विकेटकीपर फलंदाज नाही. त्यामुळं फलंदाजीत सखोलता आणि एक कॅप्टन देखील मिळत असेल तर वाईट काय आहे, असं चोप्रा म्हणाला.

आकाश चोप्रानं आयपीएल 2025 च्या हंगामात केकेआरचं नेतृत्त्व केलेल्या अजिंक्य रहाणेचं कौतुक देखील केलं आहे. आकाश चोप्रानं म्हटलं की रहाणे यानं  गेल्या हंगामात कप्तानी आणि फलंदाजी चांगली केली. मात्र, रहाणेचं वय पाहता संजू सॅमसनचा विचार केकेआर करु शकतं.

केकेआर व्यंकटेश अय्यरला रिलीज करणार?

आकाश चोप्रानं केकेआर त्यांचं बजेट चांगलं करण्यासाठी व्यंकटेश अय्यरला टीममधून रिलीज करु शकते, असं म्हटलं. केकेआरनं व्यंकटेश अय्यरला गेल्या हंगामात 23.75 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केलं होतं. त्यामुळं व्यंकटेश अय्यरला रिलीज केल्यासं केकेआरला फायदा होऊ शकतो. केकेआरनं आयपीएलच्या 2024 च्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं. मात्र, 2025 च्या आयपीएलमध्ये केकेआर आठव्या स्थानावर फेकलं गेलं होतं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.