गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात अल जजीराचे 5 पत्रकार ठार
गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 5 पत्रकार ठार झाले. यात कतारच्या मीडिया हाऊस अल जजीराचे अनस अल-शरीफ यांचा समावेश आहे. गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाजवळ पत्रकारांसाठी बांधलेल्या तंबूवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हे पत्रकार मृत्युमुखी पडले.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संपूर्ण गाझा ताब्यात घेण्याची योजना आखली आहे, परंतु जमिनीवरील परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे. आता कतारस्थित मीडिया हाऊस अल जजीराने म्हटले आहे की, रविवारी गाझा शहरातील त्यांच्या तंबूवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात त्यांचे दोन प्रतिनिधी आणि तीन कॅमेरामन तसेच एका मुख्य रिपोर्टरचा समावेश आहे. त्याच वेळी इस्रायली सैन्याने एका निवेदनात अनस अल-शरीफला लक्ष्य केल्याची कबुली दिली. परंतु मृत रिपोर्टरला हमासशी संबंधित दहशतवादी म्हणून घोषित केले.
एएफपी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, रविवारी (10 ऑगस्ट ) उशिरा गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर असलेल्या, तंबूवर झालेल्या हल्ल्यात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये अल जझीराचे प्रतिनिधी मोहम्मद करिकेह आणि कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोहम्मद नौफल आणि मोआमीन अलिवा यांचा समावेश आहे.
इस्रायली हल्ल्याबाबत, अल जझीराचे अनस अल-शरीफ यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, माझे हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले तर समजून घ्या की, इस्रायल मला मारण्यात आणि माझा आवाज दाबण्यात यशस्वी झाला आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) अनसला दहशतवादी म्हटले आहे. इस्रायली लष्कराच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अल जझीराचा पत्रकार असल्याचा दावा करणारा हमासचा दहशतवादी अनस अल-शरीफ हा हमासच्या दहशतवादी गटाचा प्रमुख होता आणि त्याने इस्रायली नागरिकांवर आणि आयडीएफ सैनिकांवर रॉकेट हल्ले केले होते.
आयडीएफने म्हटले आहे की, गाझामधील गुप्तचर संस्था आणि कागदपत्रे, ज्यात रोस्टर, दहशतवादी प्रशिक्षण यादी आणि पगाराच्या नोंदींचा समावेश आहे. यावरुन अनस अल-शरीफ हा अल जझीराशी संबंधित हमासचा कार्यकर्ता होता. प्रेस बॅज हा दहशतवादासाठी ढाल नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.