IPL 2026 मध्ये खेळणार का एम.एस. धोनी? रिटायरमेंटवर माहीने अखेर सोडलं मौन!

एम.एस. धोनी (MS Dhoni) हा अचानक मोठे निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. चाहत्यांना आश्चर्यचकित करण्याची माहीची ही जुनी सवय आहे. म्हणूनच, जेव्हा केव्हा IPL आणि धोनीबाबत चर्चा होते, तेव्हा चाहत्यांच्या धडधडी वाढतात. सध्या मात्र सगळ्यांनाच हा प्रश्न सतावत आहे की माही IPL 2026 मध्ये खेळताना दिसणार का, की हंगाम सुरू होण्यापूर्वीच निवृत्ती जाहीर करणार?

पुढील हंगामात IPL खेळण्याबाबत आता धोनीने स्वतःच मोठी अपडेट दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना माही म्हणाला, मला माहीत नाही मी खेळेन की नाही. निर्णय घेण्यासाठी सध्या माझ्याकडे वेळ नाही. माझ्याकडे डिसेंबरपर्यंतचा वेळ आहे. मी अजून काही महिने घेईन आणि मग शेवटी माझा निर्णय घेईन.

गेल्या दोन हंगामात धोनीला गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रास होताना दिसला आहे. त्याशिवाय IPL 2025 मध्ये ते बॅटने धावा करण्यासाठीही झुंजताना दिसला होता.

Comments are closed.