‘हा’ वडील बाईबाजीच्या नादात मुलीच्या आयुष्याशी खेळायचा, दुसऱ्यांच्या बायकांच्या मुलींना जगभर फि
हसीन जहान क्रिप्टिक इंस्टाग्राम पोस्ट: भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्याकडून दरमहा चार लाख रुपयांची निर्वाहभत्ता मिळाल्यानंतर, हसीन जहां हिने आपल्या मुलीचा प्रवेश एका नामांकित इंटरनॅशनल शाळेत करून दिला आहे. सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करताना हसीन जहाँ हिने एक मोठी पोस्ट लिहिली आणि पुन्हा एकदा शमीवर निशाणा साधला. अलीकडेच कोलकाता हायकोर्टाने मोहम्मद शमीला हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीच्या भरणपोषणासाठी दरमहा 4 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर हसीन जहाँ सोशल मीडियावर वारंवार क्रिप्टिक पोस्ट टाकत आहेत.
शमीवर पुन्हा हसीन जहाँने निशाणा साधला (Hasin Jahan Instagram update)
इंस्टाग्रामवर हसीन जहाँ हिने मुलगी आयरा जहाँचा शाळेच्या युनिफॉर्ममधील फोटो शेअर केला. या पोस्टला कॅप्शन देताना तिने लिहिले की, “अल्लाहमुळे आज मी खूप आनंदी आहे. माझ्या शत्रूंनी माझ्या मुलीला शाळेत प्रवेश मिळू नये असा प्रयत्न केला, पण अल्लाहने त्यांचे तोंड काळे केले आणि माझ्या मुलीला एका इंटरनॅशनल शाळेत प्रवेश मिळाला.”
इतकंच नाही, तर शमीवर थेट निशाणा साधत हसीन जहाँ पुढे लिहिले की, मुलीचे वडील खूप प्रयत्न करत होते की, माझी मुलगी चांगल्या शाळेत शिकू नये. पण वडील हे देव नसतात. जिचे वडील कोट्यधीश आहेत, तो वडील फक्त स्त्रीबाजीच्या नादात आपल्या मुलीच्या आयुष्याशी खेळ करत होता, आणि इतर स्त्रियांच्या मुलांना मात्र मोठ्या शाळांत शिकवत होता. मुलींना बिझनेस क्लास फ्लाइटने फिरवत होता, पण आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते. अल्लाहचे आभार की देशात कायदा आहे, नाहीतर आमचं काय झालं असतं माहीत नाही.”
हसीन जहाँचा हा पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटिझन्सही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. एक यूजरने लिहिलं, “शमी आपल्या मुलीवर खूप प्रेम करतो, आपण काय बोलत आहात?”
मुलीच्या वाढदिवशी शमीचा भावनिक पोस्ट (Mohammed Shami social media post)
याआधी 17 जुलै रोजी शमीने मुलगी आयराच्या वाढदिवसानिमित्त भावनिक पोस्ट शेअर करून तिच्या अनेक फोटोंसह तिच्या चांगल्या आरोग्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. 2018 पासून मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ वेगळे राहत आहेत. हसीन यांनी शमीवर घरगुती हिंसा, मॅच फिक्सिंग आणि इतर गंभीर आरोप केले होते. आयरा आपल्या आईसोबत कोलकात्यात राहते. दोघांमध्ये बराच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती आणि शेवटी कोलकाता हायकोर्टाने शमीला हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीला दरमहा 4 लाख रुपये देण्याचा आदेश दिला.
आणखी वाचा
Comments are closed.