कच्छ भाषेत बोलला, घरात घुसला अन् दिवसाढवळ्या 1 कोटींची चोरी; रक्षाबंधनादिनी भामट्याचा डल्ला

पालघर : देशभरात रक्षाबंधनाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे बहिणीकडून राखी बांधून (Rakshabandhan) घेण्यासाठी भावाने बहिणीचे घर गाठले होते. तर, काही बहि‍णींनी देखील रक्षाबंधनाच्या सणासाठी भावाच्या घरी, माहेरी भेट दिली. मात्र, रक्षाबंधनाच्या सणाचा मुहूर्त साधत, घरी कोणीही नसल्याची संधी साधूत एका भामट्याने वसईत (Vasai) दिवसाढवळ्या घरात चोरी करुन तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरात भरदिवसा अंदाजे 1 कोटी रुपयांची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरमालकाला वॉशरूममध्ये कोंडून संपूर्ण घर साफ केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. याप्रकरणी, पोलीस (Police)अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पश्चिमेच्या शास्त्री नगर, येथील किशोर कुंज इमारतीत राहणाऱ्या भानुशाली  यांच्या घरातील सर्वजण रक्षाबंधनासाठी बाहेर गेले होते. घरात 60 वर्षीय ओधव  भानुशाली हे एकटेच होते. सोमवारी दुपारी 12.30 च्या दरम्यान एका चोरट्याने घरातील लोकांच्या कच्छ भाषेत बोलचाल करुन त्यांचा  विश्वास संपादन केलं. त्यानंतर, घरात प्रवेश करुन, वॅाश रुम वापरायच्या बहाण्याने, त्यांनी वॅाशरुम लिंकेज होत आहे, असं दाखवून आरोपीने घरमालकाला बळजबरीने वॉशरूममध्ये कोंडले. त्यानंतर घरातील रोकड, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू मिळून अंदाजे 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल चोरून आरोपी फरार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपीचा शोध वेगाने सुरू आहे. या प्रकारामुळे वसई शहरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण असून, दिवसा-ढवळ्या होणाऱ्या अशा मोठ्या चोरीच्या घटनांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

उल्हासनगरमध्ये गाडीला कट मारण्यावरुन वाद

उल्हासनगर कॅम्प क्र. 3 मधील कव्हाराम चौक परिसरात मोटारसायकलची कट लागल्याच्या कारणावरून एका तरुणाला चार ते पाच जणांच्या टोळीने बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव परशुराम रेड्डी असे आहे. माहितीप्रमाणे, रात्रीच्या सुमारास परशुराम मोटारसायकलवरून कव्हाराम चौकातून जात असताना, एका महिलेला कट लागल्याने वाद निर्माण झाला. वादाच्या दरम्यान काही तरुणांनी परशुरामला मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी केवळ ऑनलाइनच नोंदणी; 15 ऑगस्टपासून नवी नियमावली, आदेश जारी

आणखी वाचा

Comments are closed.