Asia Cup: आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची निवड कधी होणार? मोठी अपडेट समोर
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीनंतर (Anderson Tendulkar Trophy) भारतीय संघ आशिया कप 2025 (Asia Cup 2025) खेळण्यासाठी 9 सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी टीम इंडिया आपल्या सर्वोत्तम खेळाडूंनी सज्ज होणार आहे. फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच भारतीय संघ टी20 फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याने सर्वांचे लक्ष टीमकडे लागून राहणार आहे. त्यामुळेच चाहत्यांना संघ निवड बैठकीची आतुरता आहे आणि याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
न्यूज 24 रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात टीम इंडियाची निवड होणार आहे. निवड समितीची बैठक मुंबईत होणार असून, बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्व सदस्यांना बीसीसीआयने याबाबत कळवले आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत बऱ्याच काळानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav) दिसणार आहे. आयपीएलनंतर (IPL) ते दुखापतीमुळे मैदानाबाहेर होते. याशिवाय, बऱ्याच काळानंतर यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि शुबमन गिल (Shubman gill) यांचीही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारीही मिळू शकते.
कसोटीनंतर भारतीय संघ टी20 फॉरमॅटमध्येही मोठे बदल करू शकतो. बऱ्याच काळानंतर अनुभवी खेळाडू पुन्हा संघात येण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) तब्बल 15 महिन्यांनंतर टी20 संघात दिसू शकतो. त्याने शेवटचे या फॉरमॅटमध्ये टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात खेळला होता. या फॉरमॅटमध्ये अलीकडे अर्शदीप सिंग (Arshdeep singh) गोलंदाजीची जबाबदारी सांभाळत होता. अक्षर पटेल, संजू सॅमसन आणि तिलक वर्माचे देखील पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.
Comments are closed.