ट्रम्प-पुटिन बैठकीपूर्वी व्होलोडिमायर झेलेन्स्की पंतप्रधान मोदींना कॉल करते

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीपूर्वी सोमवारी युक्रेनचे अध्यक्ष वोल्वोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. झेलेन्स्की यांनी स्वत: ट्विट करून या संभाषणाची माहिती दिली. तसेच पंतप्रधान मोदींनीही ‘एक्स’वर ट्विट केले. झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या संभाषणात अलिकडील घडामोडींबद्दल विचार ऐकणे आनंददायी होते. या संघर्षाच्या जलद आणि शांततापूर्ण निराकरणाच्या गरजेबद्दल मी भारताची कायमची भूमिका मांडली. भारत या दिशेने शक्य तितके योगदान देण्यास वचनबद्ध आहे. भारत युक्रेनशी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यास देखील तयार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान मोदींशी काय चर्चा झाली हे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी माझी दीर्घ चर्चा झाली. आम्ही सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली. द्विपक्षीय संबंध आणि एकूणच राजनैतिक परिस्थितीवर संवाद झाला. आमच्या लोकांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचा आभारी आहे, असे झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे. मी पंतप्रधान मोदींना झापोरिझिया येथील बस स्थानकावर झालेल्या रशियन हल्ल्याबद्दल सांगितले. हा लोकांच्या सुविधांवर जाणूनबुजून केलेला हल्ला होता. युद्धबंदीसाठी प्रयत्न करण्याऐवजी रशिया केवळ लोकांना ताब्यात घेण्याची आणि मारण्याची इच्छा दाखवत असल्याची ‘आपबीती’ही झेलेन्स्की यांनी मांडली.

Comments are closed.