कांतारा चॅप्टर 1 शाप नाही पण, दैवताने दिला होता अडथळ्यांचा इशारा; निर्मात्याने उलगडला प्रवास

कांतारा चॅप्टर 1 या चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यापासून, काही ना काही अडचणी येत आहेत. त्यामुळे कांतारा चॅप्टर 1 ची प्रदर्शनाआधीच चर्चा रंगू लागली आहे. 2021 मध्ये कांतारा थिएटरमध्ये दाखल झाला तेव्हा, या चित्रपटाने देशभरात वाहवा मिळवली. फक्त 15 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने, 400 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.

ऋषभ शेट्टीची प्रमुख भूमिका असलेला कांताराचे दिग्दर्शनही त्यानेच केले होते. परंतु प्रीक्वलच्या शूटिंगदरम्यान मात्र अनेक बातम्या कानावर येत होत्या. त्या म्हणजे शूटिंगच्या वेळी क्रू मेंबर्सना होणारे अपघात तसेच सेटवरील काही महत्त्वाच्या घडामोडी. होम्बाले फिल्म्सचे सह-संस्थापक चालुवे गौडा ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 च्या एकूण प्रवासाबद्दल बोलताना म्हणाले, हा चित्रपट म्हणजे आमच्यासाठी अडथळ्यांची शर्यत होता. हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना त्यांनी हे भाष्य केले. ते म्हणाले प्रिक्वेल करताना आम्ही दैवतेचा कौल स्विकारूनच हा चित्रपट करण्याचा विचार केला होता.

चित्रपटाला असलेल्या दैत्यांचा शाप वगैरे हे दावे फेटाळून लावत, ते म्हणाले “सेटवर घडलेली आगीची एक घटना वगळता, बाकी घडलेल्या शूटिंग संदर्भातील घटना या एकमेकांशी निगडीत नव्हत्या.”

नोव्हेंबर 2024 मध्ये चित्रपटाच्या क्रू मेंबर्सना घेऊन जाणाऱ्या बसला कर्नाटकातील कोल्लूरजवळ अपघात झाला होता. या अपघातातून सर्वजण सुरक्षित बचावले. जानेवारी 2025 मध्ये युद्धाचे चित्रीकरण करताना सेटवर आग लागली होती. परंतु यातही कुणीही गंभीर जखमी झाले नाही. तब्बल चार महिन्यानंतर शूटिंगदरम्यान चित्रपटातील एक क्रू मेंबर ब्रेक दरम्यान बुडाला होता. तर जूनमध्ये शूटिंग दरम्यान बोट उलटल्याने ऋषभ आणि इतर कलाकार थोडक्यात बचावले. पुन्हा एकदा, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

चित्रपटादरम्यान खूप अडथळे येणार याचा इशारा आम्हाला दैवाने दिला होता. त्यामुळे आम्ही अडथळ्यांसाठी मानसिकरित्या पूर्ण तयार होतो.

या सर्व घटनांवर भाष्य करताना गौडा म्हणाले की, हे सर्व अडथळे कर्नाटकच्या किनारपट्टीच्या प्रतिकूल भूभागामुळे आले आहेत. या चित्रपटाचे शूटिंग हे घनदाट जंगलात होत होते. त्यामुळे क्रूला तयार होण्यासाठी भल्या पहाटे उठावे लागत असे. घनदाट जंगलामध्ये असल्याकारणाने, सर्वजण 4.30 पर्यंत तयार होऊन आम्ही सहा वाजता शूटिंगस्थळी पोहोचायचो. चित्रपटाचे 80% चित्रीकरण हे घनदाट जंगलातच झालेले आहे. ही सर्व ठिकाणे शहरापासून दूर असल्याने, अनपेक्षित हवामान तसेच इतर भौगोलिक अडथळ्यांचा सामना करणे हे क्रमप्राप्त होते. शिवाय काही दृश्य ही आम्हाला पावसात शूट करायची होती त्यामुळे आम्हाला घनदाट जंगलात राहणे हे क्रमप्राप्त होते.

कांतारा चॅप्टर 1 चे चित्रीकरण जुलै 2025 8मध्ये संपले. हा चित्रपट सध्या पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. येत्या 2 ऑक्टोबरला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ऋषभ व्यतिरिक्त यात जयराम, राकेश पुजारी आणि रुक्मिणी वसंत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Comments are closed.