…तर हिंदुस्थानशी युद्ध अटळ; असीम मुनीरनंतर बिलावल भुट्टोची धमकी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानला युद्धाचा इशारा दिला होता. बुडण्याची वेळ आली तर अर्ध्या जगाला घेऊन बुडणार, असे विधान मुनीर यांनी अमेरिकेतून केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी यांनी हिंदुस्थान विरोधात गरळ ओकली आहे. हिंदुस्थानने सिंधू करार स्थगित ठेवला आणि सिंधू नदीवर डॅम उभारण्याचा प्रयत्न केला तर युद्ध अटळ आहे, अशी फडफड बिलावल भुट्टो यांनी केली.
Comments are closed.