ट्रम्प-पुतिन यांचा डाव युरोप उधळणार; युक्रेन-रशिया युद्धबंदीबाबत स्पष्ट केली भूमिका

रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शिखर परिषद होणार आहे. या बैठकीआधी युरोपियन युनियनने ट्रम्प आणि पुतिन यांचा डाव उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. आता युरोपियन युनियनच्या नेत्यांनी युक्रेनची बाजू घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ही जमीन युक्रेनची आहे,याबाबत योग्य काय ते ठरवतील आणि निर्णय घेतील. युरोपने आपली भूमिका युक्रेनच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केल्याने रशिया आणि अमेरिकेसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अलास्कामध्ये शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात शिखर परिषद होणार आहे. या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धाबाबत चर्चा होणार असल्याने त्याकडे जगाचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधीच युरोपियन नेत्यांनी युक्रेनची बाजू घेत ट्रम्प आणि पुतिन यांना आव्हान दिले आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या ट्रम्पच्या योजनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. युरोपियन नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, युक्रेनच्या लोकांना त्यांचे भविष्य ठरवण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. युद्धविराम किंवा शत्रुत्व कमी करण्याच्या संदर्भात अर्थपूर्ण चर्चा होऊ शकते. मात्र, कोणताही निर्णय एकतर्फी लादणे योग्य होणार नाही. आमचा असा विश्वास आहे की यावर फक्त एकच राजनैतिक उपाय आहे आणि तो म्हणजे युक्रेन आणि युरोपच्या महत्त्वाच्या सुरक्षा हितांचे रक्षण करणे, असे युरोपियन नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
युरोपियन नेत्यांमध्ये सोमवारी भूमिकेबाबत चर्चा झाली आणि त्यांनी मंगळवारी भमिका स्पष्ट केली आहे. हंगेरी वगळता सर्व युरोपियन युनियन सदस्य देशांच्या नेत्यांनी याला पाठिंबा दिला आहे. युरोप आणि युक्रेनचे देश पुतिन आणि ट्रम्प यांच्यातील शिखर परिषदेबद्दल चिंतेत आहेत. त्यांना भीती आहे की ट्रम्प यांच्याशी चर्चेत पुतिन स्वतःसाठी सवलती मिळवतील आणि युक्रेनशिवाय एकतर्फी शांतता कराराची रूपरेषा ठरवू शकतो. रशियाने व्यापलेली युक्रेनची जमीन रशियाला दिली जाऊ शकते या ट्रम्पच्या विधानाबद्दल युरोपीय देश चिंतेत आहेत. युक्रेन बैठकीला उपस्थित राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, युरोपने आपली भूमिका स्पष्ट केल्याने ट्रम्प आणि पुतिन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Comments are closed.