अजित पवारांनी जनाची नाही तरी मनाची तरी लाज बाळगावी, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

महायुतीत काही आलबेल नाही असं दिसतंय. कारण भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवारांनी जनाची नाही तरी किमान मनाची तरी लाज बाळगावी असे विधान विखे पाटील यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीतली धुसफूस पुन्हा समोर आली आहे.

धाराशीवमध्ये एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इथेनॉल धोरण लागू केले आणि साखर कारखान्यांना जीवदान दिले. पण अजित पवार यांच्या साखर कारखान्यात पंतप्रधान मोदींचे आभार मानणारा एकही बॅनर लावला गेला नाही. इतकंच नाही तर कारखान्यात सभा घेऊन अभिनंदनाचा एक ठरावही मंजूर करण्यात आला नाही. अजित पवार यांनी जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगावी अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

Comments are closed.