विंडीजची धाकधूक वाढली!द्विस्तरीय प्रणालीमुळे स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) द्विस्तरीय प्रणाली लागू होण्याआधीच विंडीजची धाकधूक वाढलीय. या प्रणालीमुळे डब्ल्यूटीसीच्या मुख्य श्रेणीतून विंडीजचा संघ आपोआपच बाहेर फेकला जाण्याची दाट शक्यता आहे. डब्ल्यूटीसीच्या गेल्या तिन्ही स्पर्धांमध्ये विंडीज संघ नऊ संघात आठव्या क्रमांकावर धडपडत होता. त्यातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला होता.

त्रिनिदाद येथे झालेल्या क्रिकेट वेस्ट इंडीजच्या तातडीच्या बैठकीनंतर सीईओ क्रिस डेहरिंग यांनी आम्हाला आयसीसीसमोर आपली भूमिका ठामपणे मांडावी लागेल. बदलांवर अधिक सतर्प राहून कोणत्याही परिस्थितीत त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, अशी भूमिका मांडली आहे.

गेल्या महिन्यात आयसीसीने माजी फलंदाज रोजर टूज यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने डब्ल्यूटीसीच्या द्विस्तरीय प्रणालीबाबत चर्चा केली असली तरी या प्रणालीबाबत 2009 पासून चर्चा आहे आणि कसोटीच्या सदस्य देशांमध्ये एकमत नसल्याचे दिसून आलेय.

या बैठकीत विंडीजचे क्लाईव्ह लॉईड, ब्रायन लारा आणि व्हिव रिचर्ड्स हे दिग्गज उपस्थित होते. लॉईड यांनी आयसीसीच्या निधी वितरणातील तफावतीवर जोरदार टीका करताना सांगितले की, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडला 18 कोटी, तर वेस्ट इंडीजला फक्त 8 कोटी. या अन्यायाला वाचा पह्डण्याची वेळ आलीय. तसेच नव्या प्रणालीमुळे आम्ही पुढील 100 वर्षे खालच्या गटात राहण्यापासून फक्त दोन वर्षे दूर असल्याचे ते म्हणाले. हे फार अन्यायकारक असून आम्हाला आवाज उठवावाच लागणार आहे.

Comments are closed.