बाॅलीवूडमधला ‘हा’ आहे सर्वात महागडा घटस्फोट, वाचा सविस्तर

बॉलीवूड म्हणजे श्रीमंताचा महासागर … येथे कोणतीच गोष्ट ‘चीप’ नसते. बॉलीवूडच्या कलाकारांच्या घरी होणारे कार्यक्रम असो, चित्रपटांचे प्रमोशन असो किंवा अगदी कलाकारांचे घटस्फोट असो. येथे प्रत्येक गोष्ट महाग असते. बॉलीवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक कलाकारांची लग्न झाली. या अनेकांनी लाखो करोडो रुपये खर्च केले. पण खरंतर लग्नासाठी होणारा खर्च हा घटस्फोटासाठी केले्ल्या खर्चापेक्षा फारच कमी असल्याचे आढळून आले आहे.
बॉलीवूडमधील सर्वात महागडा डिवोर्स सध्या चर्चेचा विषय बनलाय आणि तो म्हणजे बॉलीवूडचा Greek God हृतिक रोशन आणि सुझान खानचा घटस्फोट. हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट होता. हृतिक रोशनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सुझानला 380 कोटी रुपये पोटगी मिळाली. ज्यामुळे हा बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.
हृतिक रोशन आणि संजय खान यांची मुलगी सुझान हे बालपणीचे मित्र होते. कहो ना प्यार है या चित्रपटाद्वारे हृतिकने बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर एंट्री केली. मात्र बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी हृतिक आणि सुझान चार वर्षे डेटिंग करत होते. यानंतर सन 2000 मध्ये हृतिकने सुझानशी लग्न केले. यानंतर 2006मध्ये रेहानचा जन्म झाला आणि 2009 मध्ये ऋदानचा जन्म झाला. यानंतर १४ वर्षांच्या संसारानंतर 2014 मध्ये हृतिक आणि सुझान हे वेगळे झाले.
सुझानसोबतचे नाते संपवल्यानंतर, आता हे दोघांनीही त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सध्या हृतिक सबा आझादला डेट करत आहे, तर सुजैन अब अर्सलान गोनीला डेट करत आहे.
Comments are closed.