शिवसेनेच्या प्रयत्नांना यश, पारसिक ते पनवेल एसटी पहिल्यांदाच धावली; लाखो खारेगाववासीयांची मोठी सोय

ठाण्याचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या खारेगाव-पारसिक येथून पनवेलकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे पारसिक ते पनवेल एसटी सेवा सुरू झाली असून मंगळवारी या सेवेचा शुभारंभकरण्यात आला. रोज सकाळी ७ वाजता ही एसटी पारसिक येथून पनवेलकडे रवाना होईल.

पारसिकनगर व खारेगाव येथून रोज अनेक रहिवासी पनवेलपर्यंत नोकरी-धंद्यानिमित्त प्रवास करतात. ऐन गर्दीच्या वेळी त्यांचे प्रवास करताना प्रचंड हाल होते. याची गंभीर दखल खारेगावमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत शिंदे आणि उपशहरप्रमुख श्रीकांत मोरे यांनी यासाठी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला आणि पारसिक ते पनवेल मार्गावर एसटी बस मंजूर झाली.

मंगळवारी उपविभागप्रमुख नंदकिशोर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक चंद्रकांत विधाटे, विधानसभा संघटक पुष्पलता भानुशाली, समन्वयक निलिमा शिंदे, उपशहरप्रमुख मुकुंद ठाकूर, उपविभागप्रमुख दौलत सरवणकर, धीरज मोरे, शाखाप्रमुख सुहास चव्हाण, दिनेश ठाकूर, संतोष बोरावकर, विलास खेडकर, नरेश चाळके, राजेंद्र भोसले, प्रकाश मोहिते, महिला आघाडीच्या अश्विनी म्हात्रे, स्नेहल भोसले, उमा नलावडे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास दळवी आवर्जून उपस्थित होते. बस चालक शिवा दुकळे यांना काशिनाथ विचारे याच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तर बसवाहक सीमा थोरात यांचा उपशहर संघटक नमिता सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments are closed.