धिस इज माय फॉल्ट ओन्ली; पाय बांधले अन् गळ्याला लावली दोर, संभाजीनगरमधील माजी नगरसेवकाच्या मुलाच

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजी नगरसेवक तसेच बांधकाम व्यावसायिक राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेश तनवाणी (वय वर्षे 26) याने उस्मानपुऱ्यातील फ्लॅटमध्ये गळफास घेवून आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. राजू तनवाणी याने गळफास घेण्याआधी नोट लिहल्याचंही समोर आलं आहे. ‘आय एम नॉट अंडर प्रेशर. धिस इज माय फॉल्ट ओन्ली, आय एम सॉरी’ अशी इंग्रजीमधून नोट लिहून राजू तनवाणी यांचा मुलगा दीपेश तनवाणी याने उस्मानपुऱ्यातील फ्लॅटमध्ये गळफास घेतला आहे. दिवसभरात त्याने कोणताही प्रतिसाद दिला नसल्यामुळे फ्लॅटमध्ये प्रवेश करत बेडरूमची खिडकी तोडल्यानंतर मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत दीपेश तनवाणीचे आई-वडीलांसह हे मछलीखडक परिसरात राहत होता. तो तीन महिन्यांपूर्वीच उस्मानपुऱ्यातील अमृतसाई एकदंत या अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरती राहण्यासाठी गेला होता. त्याने सोमवारी आणि मंगळवारी सकाळपर्यंत घरून आलेल्या  कॉलला कोणताही प्रतिसाद न दिल्याने कुटुंबाने तो रहायला गेलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी एका व्यक्तीने डकमधून त्यांच्या गॅलरीत जाऊन बेडरुमची खिडकी तोडल्यानंतर तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, पोलिसांंनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून पंचनामा करून दिपेशचा मृतदेह खाली उतरवून रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला.

दीपेशने नवी दोरी आणली

दीपेशने गळफास घेतलेला दोर नवा असल्याचे तपासात आढळले. एका दोराने त्याने स्वतःचे दोन्ही पाय बांधले. गळफास घेताना दोरीत दोन्ही हाताचे मनगट अडकवत टेबलवर उभे राहून त्याने गळफास घेतला. सोमवारी त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे

दीपेशने विदेशातून एमबीए केलं नंतर व्यवसायात आला

दीपेशने विदेशातून एमबीएची पदवी घेतली होती. कोरोना काळामध्ये तो परत शहरात आला, त्यानंतर तो कौटुंबिक व्यवसायात सक्रिय झाला होता. अनेकदा तो प्रवास करत होता. 9 ऑगस्ट रोजी राखीपौर्णिमेला तो शेवटचं घरी आला होता. सोमवारी सकाळनंतर त्याने फोन उचलणे बंद केले. सोमवारी सकाळी फोन लागत होते, मात्र दुपारी तीन नंतर त्याच्या फोनची बॅटरी संपून त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला.

घराच्या डिजिटल लॉकवर एकच फिंगर प्रिंट

दीपेशचे पाय बांधलेले असल्यामुळे सुरुवातीला याप्रकरणी हत्या की आत्महत्या अशा चर्चा झाल्या. मात्र, फ्लॅटचा मुख्य दरवाजा आणि  बेडरूम आतून लॉक केलेल होते. मेन दरवाजाला डिजिटल लॉक होतं, त्यावरती फक्त दीपेशच्या बोटांचे ठसे असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही आत्महत्याच असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिस पुढील तपास सुरू आहे.

माझा दबाव नाही, मला माफ करा …

दीपेशने आत्महत्येपूर्वी हिशोबाच्या रजिस्टरमध्ये इंग्रजीमध्ये सुसाइड नोट लिहून बेडवर ठेवली होती. त्यात ‘मी दबावाखाली नाही. ही केवळ माझीच चूक आहे. माझ्या जवळच्या व्यक्तींना त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. मी सर्वाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. मी सगळ्यांना आनंदी ठेवू शकलो नाही. त्यासाठी माफ करा. आय लव्ह यू’ असे नोटमध्ये लिहले आहे. या संपूर्ण नोटमध्ये त्यांनी चार वेळेस ‘आय एम सॉरी’ म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.