'प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा साठी जागा नाही….', हिटमॅनवर इरफान पठाणची जोरदार टीका
रोहित शर्मा टी20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 2024 टी20 वर्ल्ड कप भारताने त्याच्या नेतृत्वाखाली जिंकला तेव्हा रोहितने टी20 फॉर्मेटला अलविदा केला. नंतर 2024-25 बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियामध्ये गमावल्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर माजी भारतीय खेळाडू इरफान पठाणनेही ‘हिटमॅन’वर जोरदार टीका केली आहे.
इरफान पठाण द लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबद्दल बोलताना म्हणाला, “रोहित शर्मा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जबरदस्त खेळाडू आहे, पण त्या वर्षी कसोटीत त्याचा सरासरी फक्त 6 होती. त्यामुळे आम्ही म्हटलं, जर तो कर्णधार नसता, तर त्याची टीममध्ये जागाच नसती, आणि हे खरं आहे.”
इरफान पठाण पुढे म्हणाला की, ‘लोक म्हणतात की आम्ही रोहित शर्माला गरजेपेक्षा जास्त पाठिंबा दिला. पण हे स्पष्ट आहे की जर कोणी तुमच्या प्रसारण चॅनेलवर मुलाखत देण्यासाठी आला तर तुम्ही त्याच्याशी गैरवर्तन करणार नाही, तुम्ही त्याला आमंत्रित केले आहे म्हणून तुम्ही सभ्यतेने वागाल’. पुढे तो म्हणाला की ‘जेव्हा रोहित शर्मा मुलाखत देण्यासाठी आला तेव्हा तुम्हाला सभ्यता दाखवावी लागेल हे स्पष्ट आहे, कारण तो तुमचा पाहुणा आहे आणि आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत हे त्याच्याशी जोडलेले होते’.
इरफान पठाण पुढे संभाषणात म्हणाला की ‘आम्ही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढायला हवे असे म्हटले होते. पण आम्ही असेही म्हटले होते की जर तो संघाचा कर्णधार नसता तर त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नसते’. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही कसोटी मालिका 3-1 ने गमावली.
Comments are closed.