गृहकर्जाची ठरलेल्या वेळेपूर्वी परतफेड कशी करायची? तीन स्मार्ट पर्याय ज्यानं कर्ज लवकर संपेल
नवी दिल्ली : प्रत्येकाला स्वत: च्या मालकीचं हक्काचं घर असावं असं वाटत असतं. घर खरेदीचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक जण आनंदी असतो. मात्र, घर खरेदी करताना अनेकांना गृहकर्ज घ्यावं लागतंगृह कर्ज 20 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी घ्यावं लागतं. ज्याची परतफेड करताना अनेकदा पगाराच्या 50 टक्के रक्कम गृहकर्जाच्या ईएमआय साठी खर्च होते. गृहकर्जाचे हप्ते किती दिवस फेडायचे अशी मानसिकता अनेकजणांची तयार होते, ज्याचा तणाव देखील येत असतो.
जर एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृह कर्ज घेतलं तर त्याची पूर्ण परतफेड करताना बँकांना जवळपास तितकीच रक्कम व्याज म्हणून द्यावी लागते. मात्र, घाबरण्याची गरज नाही, काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचं गृहकर्ज काही वर्षांमध्ये पूर्णपणे फेडू शकता आणि त्यामुळं व्याज म्हणून जाणारे लाखो रुपया देखील वाचू शकतात. या तीन मार्गांची आपण माहिती घेणार आहोत.
दर महिन्याला ईएमआय वाढवा
गृहकर्जाचा हप्ता भरत असताना सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे तुम्हाला दरमहा ईएमआय पेक्षा अधिक रक्कम भरायची आहे. समजा तुमचा ईएमआय 40000 रुपया असेल तर तुम्ही दरमहा 45000 रुपया भरण्याचा प्रयत्न करा, यामुळं तुमच्या मुद्दलाच्या रकमेतील 5000 रुपया कमी होतील. जेव्हा मुद्दल कमी होती त्यावेळी त्यावर आकारलं जाणारं व्याज देखील कमी होतं. यामुळं कर्ज निश्चित वेळेपेक्षा लवकर संपते. दरवर्षी ज्या प्रमाणात तुमचा पगार वाढतो त्या प्रमाणे ईएमआय ची रक्कम वाढवल्यास त्याचा देखील फायदा कर्ज लवकर संपण्यास होतो.
वर्षातून एकदा प्रीपेंट
काही पगारदार व्यक्तींना वर्षातून एकदा दिवाळी बोनस, प्रोत्साहन किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल तर ते इतर गोष्टींवर खर्च करतो. तुम्हाला जर अशा प्रकारची रक्कम मिळाल्यास तुम्ही त्याचा वापर गृह कर्जाचं प्रीपेंट करण्यासाठी करु शकता. प्रीपेमेंटद्वारे भरलेली रक्कम थेट मुद्दलात जमा होत असल्यानं फायदा होता. मुद्दल कमी झाल्यास कर्ज परतफेडीमध्ये फायदा होता. मुद्दल कमी झाल्यास व्याज देखील कमी भरावं लागतं?
गृह कर्ज हस्तांतरण करणे :
जर तुम्ही एखाद्या बँकेतून गृहकर्ज घेतलं असेल आणि दुसऱ्या बँकेत हस्तांतरण करण्याचा विचार करत असाल तर याद्वारे तुम्ही शिल्लक असलेलं मुद्दल हस्तांतरण करु शकता. जर तुम्ही 9.5 टक्क्यांनी गृह कर्ज घेतलेलं आहे आणि तुम्हाला दुसरी बँक 8.5 टक्क्यांनी कर्ज देत असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. 0.5 टक्के ते 1 टक्के व्याज दर कमी झाल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते.यामध्ये प्रक्रिया फी लागते मात्र लाखांमध्ये रक्कम वाचणार असेल तर नाममात्र प्रक्रिया फी भरणं योग्य ठरु शकतं? केवळ, घरगुती कर्ज हस्तांतरण करायचं असल्यास किमान 5 ते 7 वर्षांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणं आवश्यक आहे.
आणखी वाचा
Comments are closed.