रविचंद्रन अश्विनचा आरोप! CSK ने ‘ह्या’ खेळाडूला करारापेक्षा दिले जास्त पैसे

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने दावा केला की, डेवाल्ड ब्रेविसला (Dewald Brevis) साइन करण्यासाठी CSK ने गुप्त पद्धतीने व्यवहार केला. ब्रेविस हा तोच खेळाडू आहे ज्याला आयपीएल 2025 मध्ये गुरजपनीत सिंहच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून साइन करण्यात आले होते. त्यावेळी CSK ने या युवा दक्षिण आफ्रिकन खेळाडूला 2.2 कोटी रुपये देऊन टीममध्ये घेतले होते.

अश्विनच्या मते, अनेक संघ ब्रेविसला आपल्या स्क्वॉडमध्ये घेऊ इच्छित होत्या, पण ब्रेविसच्या एजंट्ससोबत अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर CSK ने जास्त पैसे देऊन त्याला आपल्या टीममध्ये घेतले. अश्विनने हेही सांगितले की ब्रेविससारख्या खेळाडूंना माहिती असते की लिलावात (ऑक्शनमध्ये) त्यांना बेस प्राइसपेक्षा जास्त रक्कम मिळेल, त्यामुळे ते आपल्या मर्जीप्रमाणे पैशांची मागणी करू शकतात.

अश्विन म्हणाला, मी ब्रेविसबद्दल एक गोष्ट सांगतो. मागच्या हंगामात त्याने CSK सोबत छान वेळ घालवला आणि अनेक टीम्स त्याच्यात रस दाखवत होत्या. पण जास्त प्राइस असल्यामुळे अनेकांनी त्याला साइन केले नाही. रिप्लेसमेंट म्हणून त्याला बेस प्राइस मिळायला हवा होता, पण एजंट्सशी चर्चा झाली आणि खेळाडूने स्पष्ट केले की जास्त पैसे मिळाले तरच तो टीममध्ये येईल.

हे असे घडते कारण खेळाडूंना माहीत असते की, जर पुढच्या हंगामात त्यांना रिलीज केले तर ऑक्शनमध्ये त्यांना जास्त दर मिळू शकतो. ब्रेविसची अट होती की जास्त पैसे मिळाले तर ठीक, नाहीतर पुढच्या हंगामात तो लिलावात नाव नोंदवेल. CSK जास्त पैसे देण्यास तयार होती, त्यामुळे तो टीममध्ये आला. डेवाल्ड ब्रेविसने मागील हंगामात फक्त 6 सामने खेळले, ज्यात त्याने 37.50 च्या सरासरीने 225 धावा केल्या. यामध्ये त्याने 2 अर्धशतके ठोकली होती.

Comments are closed.