एका टेस्ट सामन्यात 20 विकेट्स घेणारे गोलंदाज! पाहा एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांची यादी

क्रिकेटच्या खेळात जसे फलंदाजासाठी शतक झळकावणे अवघड असते, तसाच गोलंदाजासाठी 5 विकेट हॉल मिळवणेसुद्धा कठीण असते. वनडे आणि टी-20 सामन्यात फक्त 10 विकेट घेऊन विजय मिळवता येतो, पण कसोटी सामन्यात दोन डाव असतात. या दोन डावांमुळे एखादा गोलंदाज एका कसोटी सामन्यात 20 विकेट घेऊ शकतो.

पण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा प्रसंग कधी आला आहे का, जेव्हा एका गोलंदाजाने एकाच सामन्यात 20 विकेट घेतल्या आहेत? येथे पाहू या एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप-5 गोलंदाजांची यादी.

आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कुठल्याही गोलंदाजाने एका सामन्यात संपूर्ण 20 विकेट घेतलेल्या नाहीत. मात्र, इंग्लंडच्या जिम लेकर यांनी 19 विकेट घेऊन विक्रम केला आहे. हा विक्रम गेल्या 69 वर्षांपासून त्यांच्याच नावावर आहे. 1956 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 9 आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सर्व 10 फलंदाज बाद केले होते. त्याआधी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या सिडनी बार्न्स यांच्या नावावर होता. त्यांनी 1913 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17 विकेट घेतल्या होत्या.

या यादीत भारताचा नरेंद्र हिरवानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा रॉबर्ट आर्नोल्ड मासी आणि श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरन यांनीसुद्धा एका टेस्टमध्ये 16 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे.

एका कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

जिम लेकर (इंग्लंड) – 19 विकेट

सिडनी बार्न्स (इंग्लंड) – 17 विकेट

नरेंद्र हरवाणी (भारत) – 16 विकेट्स

रॉबर्ट अर्नोल्ड मासी (ऑस्ट्रेलिया)- 16 विकेट्स

मुतिआ मुरलीधरन (श्रीलंका)- 16 विकेट्स

भारतातर्फे एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नरेंद्र हिरवानी यांच्या नावावर आहे. त्यांनी 1988 साली वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही डावात 8-8 विकेट घेत 16 विकेट घेतल्या होत्या. त्यांच्या पाठोपाठ हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी एका सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. अनिल कुंबळे (14 विकेट), विनू मांकड (13 विकेट) आणि जवागळ श्रीनाथ (13 विकेट) यांनीसुद्धा हा पराक्रम केला आहे.

भारतातर्फे एका टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-५

नरेंद्र हरवनी- 16 विकेट्स

हरभजन सिंग- 15 विकेट

अनिल कुंबळे- 14 विकेट

विनू मांकड – 13 विकेट

जवागळ श्रीनाथ – 13 विकेट

Comments are closed.