ग्लेन मॅक्सवेल इतिहास रचण्यासाठी सज्ज…! असा रेकाॅर्ड करणारा ठरणार पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
ग्लेन मॅक्सवेल टी 20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना 16 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे, त्यामुळे दोन्ही संघांचे लक्ष शेवटच्या सामन्यात मालिका जिंकण्यावर असेल. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेल, ज्याची बॅट शांत असली तरी तो गोलंदाजीमध्ये कमाल करत आहे, दरम्यान त्याला इतिहास रचण्याची संधी आहे.
गेल्या काही काळापासून टी20 क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलने गोलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात एक विकेट घेण्यात यशस्वी झाला, तर तो आपल्या 50 टी20 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण करेल. याचसोबत, तो असा रेकाॅर्ड करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरेल, ज्याच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2,500 पेक्षा जास्त धावा आणि 50 विकेट्स असतील. (First Australian with 2500 runs and 50 wickets)
आतापर्यंत फक्त 3 खेळाडूंना हा पराक्रम करता आला आहे, ज्यात शाकिब अल हसन, मोहम्मद हाफिज आणि मलेशियाचा खेळाडू वीरनदीप सिंग यांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत ग्लेन मॅक्सवेलची बॅट दोन्ही सामन्यांमध्ये शांतच राहिली आहे. पहिल्या सामन्यात त्याने फक्त 1 धाव काढली, तर दुसऱ्या सामन्यात त्याच्या बॅटमधून 16 धावा निघाल्या. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतही मॅक्सवेल फलंदाजीमध्ये खास काही करू शकला नाही. मात्र, या काळात त्याने गोलंदाजीमध्ये चांगले योगदान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. (Glenn Maxwell recent form)
Comments are closed.