वडिलांनी गाजवलं क्रिकेटचं मैदान, पण मुलाला जमली नाही कमाल! पहा अशा क्रिकेटपटू बाप-लेकांची यादी
क्रिकेटच्या इतिहासातील फादर मुलगा जोडी: क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू महान बनतात, तर काहींची कारकीर्द खूप लहान असते. प्रत्येकाला या खेळात यश मिळेलच असे नाही. क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारखे अनेक दिग्गज आहेत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे रेकाॅर्ड केले, पण त्यांच्या मुलांनी वडिलांसारखे मोठे नाव कमावले नाही. क्रिकेटमध्ये अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्या वडिलांनी क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले, पण त्यांच्या मुलांना विशेष काही करता आले नाही. (Father son cricketer list)
सचिन तेंडुलकर-अर्जुन तेंडुलकर– सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द इतकी शानदार होती की, त्याला ‘क्रिकेटचा देव’ मानले जाते. या दिग्गज खेळाडूच्या नावावर ‘शतकांचे शतक’ करण्याचा रेकाॅर्ड आहे, तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्डही सचिनच्या नावावर आहे. मात्र, त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर अद्याप भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुनला आपल्या संघात घेतले होते, पण अर्जुनला या स्पर्धेत विशेष कमाल दाखवता आली नाही. (Sunil Gavaskar Rohan Gavaskar career)
हनीफ मोहम्मद-शोब मोहम्मद- हनीफ मोहम्मद कसोटीतील सर्वात लांब खेळीसाठी ओळखले जातात. पाकिस्तानच्या या दिग्गज खेळाडूने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 970 मिनिटे क्रीजवर उभे राहून 337 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यांचा मुलगा शोएब मोहम्मदला क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावता आले नाही. शोएबने 45 कसोटी सामन्यांमध्ये 44.34च्या सरासरीने धावा केल्या. (Hanif Mohammad Shoaib Mohammad)
सुनील गावस्कर-रोहन गावस्कर- भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू ‘लिटिल मास्टर’ सुनील गावस्कर यांच्या नावावर अनेक रेकाॅर्ड आहेत. ते कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारे पहिले भारतीय खेळाडू होते आणि त्यांच्या नावावर कसोटीत 34 शतके आहेत. मात्र, त्यांचा मुलगा रोहन गावस्करने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 11 वनडे सामने खेळले, ज्यात त्याने 18.87च्या सरासरीने 151 धावा केल्या. रोहन गावस्करची क्रिकेट कारकीर्द काही खास राहिली नाही. (Sunil Gavaskar Rohan Gavaskar career)
संजय बंगार-अन्या बंगार- संजय बांगर भारतीय संघासाठी खेळले आहेत आणि भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षकही राहिले आहेत. त्यांचा मुलगा आर्यन अंडर-16 क्रिकेट खेळला होता. पण आता आर्यनने शस्त्रक्रियेद्वारे अनाया बनून आपले लिंग बदलले आहे. अनाया एक ग्राफिक डिझायनर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. (Sanjay Bangar Anaya Bangar story)
Comments are closed.