शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्या कारला सिटीफ्लोच्या बसने जोरदार धडक दिली. हा अपघात मुंबईतील रस्त्यावर झाला असून या धडकेत शिल्पाच्या कारच्या मागील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे, परंतु या अपघातानंतर बस कंपनीने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शिल्पा शिरोडकरने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून संताप व्यक्त केला आहे. सुदैवाने या अपघातात माझ्या टीममधील कोणत्याही सदस्याला दुखापत झाली नाही.

Comments are closed.