लिंग परिवर्तन केलेली क्रिकेटपटू अनाया बांगर बिग बॉस 19 मध्ये? सलमान खानच्या शोमधून मिळाली ऑफर
मुलगा असताना मुलगी बनलेली क्रिकेटपटू अनाया बांगर लवकरच बिग बॉसच्या घरात दिसू शकते. सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस शोमधून अनायाला ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. ‘घरवालों की सरकार’ या राजकीय फॉरमॅटवर आधारित हा वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉसचा 19वा सीझन 24 ऑगस्टपासून कलर्स टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शोच्या प्रीमियरपूर्वीच संभाव्य स्पर्धकांची यादी समोर आली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
यातले सर्वात नवे नाव म्हणजे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर. ईटाइम्स टीव्हीच्या वृत्तानुसार बिग बॉस 19च्या निर्मात्यांनी अनायाशी संपर्क साधला आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. अनाया सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या मोकळ्या विचारांसाठी आणि बिनधास्त भूमिकांसाठी ओळखली जाते. बिग बॉसमध्ये तिचा प्रवेश झाला तर घरात ती एक वेगळी आणि स्पष्टवक्ती भूमिका मांडेल अशी अपेक्षा आहे.
अलीकडेच अनायाने पहिल्यांदाच दोन्ही हातांवर मेहंदी लावली होती. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर श्रावण महिन्यानिमित्त मेहंदीचे फोटो शेअर केले. एका मुलाखतीत अनायाने सांगितले होते की ती जेव्हा 8-9 वर्षांची होती, तेव्हा आईच्या कपाटातून कपडे काढून घालायची आणि आरशात बघून स्वतःला मुलगी समजायची. ती म्हणाली की, “मला मुलगी व्हायचं आहे.” अनायाने मुशीर खान, सरफराज खान, यशस्वी जायसवाल यांसारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूं सोबत क्रिकेट खेळले आहे. लिंग परिवर्तनानंतर ती इंग्लंडहून भारतात परतली आहे.
अनाया बांगर व्यतिरिक्त बिग बॉस 19 मध्ये सहभागी होण्याची शक्यता असलेल्या इतर नावांमध्ये रति पांडे (मिले जब हम तुम), हुनर हाली, अपूर्व मुखीजा उर्फ द रेबेल किड, फैसल शेख उर्फ मिस्टर फैसू, धनश्री वर्मा, श्रीराम चंद्रा, मीरा देवस्थले आणि भाविका शर्मा यांचा समावेश आहे. तसेच, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढा, गुरचरण सिंग आणि जेनिफर मिस्त्री यांनाही पाहण्याची शक्यता आहे.
याशिवाय, रॅपर रफ्तार, शहनाज गिलचा भाऊ शाहबाज, टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि पारस कलनावत हेसुद्धा या सीझनमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा आहे.
Comments are closed.