Independence Day : स्वातंत्र्यानंतर भारत-पाक दोन्ही संघांसाठी खेळलेले 'हे' 3 क्रिकेटपटू

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या सत्तेतून मुक्त झाला. मात्र, स्वातंत्र्यासोबतच भारताचे दोन भाग झाले आणि पाकिस्तान स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. स्वातंत्र्य लढा आणि भारत-पाक विभाजनामध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले, अनेक कुटुंबे तुटली. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि आजपर्यंत क्रिकेटमध्येही द्विपक्षीय मालिका क्वचितच झाल्या. तरीही, क्रिकेटच्या इतिहासात काही खेळाडूंनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी खेळण्याचा मान मिळवला. त्यापैकी 3 खेळाडूंची कथा विशेष आहे.

अब्दुल हफीज करदार यांना “पाकिस्तान क्रिकेटचे जनक” म्हटले जाते. डावखुरा फलंदाज असलेले करदार स्ट्रेट ड्राईव्हसाठी प्रसिद्ध होते आणि ते फिरकी गोलंदाजीही करत. पाकिस्तानसाठी त्यांनी 23 कसोटी सामने खेळले, तर त्याआधी भारतासाठी 3 कसोटी सामने खेळले होते. 1952 मध्ये ते पाकिस्तानचे पहिले कसोटी कर्णधार झाले आणि पहिला सामना भारताविरुद्धच खेळला.

आमिर इलाही यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मीडियम पेस गोलंदाज म्हणून केली, पण नंतर ते लेग-ब्रेक स्पिनर झाले. त्यांनी 119 सामन्यांत 506 विकेट घेतल्या. 1947 मध्ये सिडनी येथे भारतासाठी कसोटी पदार्पण केले, पण विभाजनानंतर पाकिस्तानसाठी 5 सामने खेळले.

गुल मोहम्मद, डावखुरा फलंदाज, यांनी 22 जून 1946 रोजी भारतासाठी पदार्पण केले आणि 11 ऑक्टोबर 1956 रोजी पाकिस्तानसाठी शेवटचा सामना खेळला. रणजी ट्रॉफी 1946/47 हंगामात बडोद्याविरुद्ध 319 धावांची खेळी ही त्यांची कारकीर्दीतील सर्वात प्रसिद्ध इनिंग होती.

Comments are closed.