पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून GST कमी करण्याचे संकेत; लाल किल्ल्यावरून देशवासियांना म्हणाले, या द
स्वातंत्र्य दिन 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day 2025) पार्श्वभूमीवर आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी लाल किल्ल्यावरुन नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना या दिवाळीत देशवासियांना मोठं गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले.
नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळेल. आम्ही एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स आणणार आहोत. दिवाळीत ही तुमची भेट ठरेल. सामान्य माणसाचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
पंतप्रधान विकसित भारत योजना आजपासून सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशातील तरुणांनो, आज मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज १५ ऑगस्ट आहे. आजपासूनच माझ्या देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना राबवली जात आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू होत आहे. तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्याला सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचंय : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करावेत. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. सध्या आपण खतांसाठी (फर्टिलायझर) इतरांवर अवलंबून आहोत. चला आपण खतांचा साठा करून ही अवलंबित्वाची गरज संपवू. आगामी काळात ईव्ही बॅटरीचा युग सुरू होईल. आपण त्या बॅटऱ्याही बनवू. आम्हाला आमच्या तरुणांवर पूर्ण विश्वास आहे. गेल्या 11 वर्षांत उद्योजकतेला मोठी चालना मिळाली आहे. आज लाखो स्टार्टअप्स देशाला बळ देत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य केलंय. ते म्हणाले की, आजचा दिवस एक विशेष महत्त्वाचा दिवस आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, लाल किल्ल्वरून मला ऑपरेशन सिंदूरमधील वीर जवानांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या वीरांनी अशा प्रकारे हे क्षण घडवले की, ते कल्पनेपलीकडचं होतं. ही घटना अशी होती की, पहलगाममध्ये सीमा पारून आलेल्या अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर नरसंहार केला. लोकांचा धर्म विचारून, ओळखून त्यांची हत्या केली गेली. संपूर्ण हिंदुस्थान या घटनेनंतर संतापलेला होता. आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. पाकिस्तानमध्ये जे काही घडलं, त्याचा परिणाम इतका प्रचंड होता की, आजही रोज नवनवे खुलासे होत आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.