लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले, स्वातंत्र्य चळवळ व RSS संबंध काय? काँग्रेसचा सवाल

स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलत त्या प्रमाणे वागत होते, पण त्याला मागील ११ वर्षात याला बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पंतप्रधान आज जे बोलले तेही खोटेच बोलले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

देशाची फाळणी ही एक दुःखद घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल होते म्हणून देश एकसंध राहिला नाहीतर ६०० देश झाले असते. फाळणीचे दुःख आहेच पण भाजपा सरकार १३ ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा फतवा काढते, हा काय प्रकार आहे. १९४२ चे चले जाव आंदोलन सुरू होते तेव्हा आरएसएस हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते, असेही सपकाळ म्हणाले.

तरुणांना १५ हजार रुपये देण्याच्या पंतप्रधानांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू या सारख्या घोषणा यांनीच दिल्या होत्या पण त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ही घोषणा सुद्धा फसवीच ठरेल असेही सपकाळ म्हणाले.

वन नेशन वन इलेक्शन एवढ्यापुरतेच हे मार्यादित नाही तर वन नेशव वन लिडर, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टिव्ही चॅनल व एकच व्यंजन ही संकल्पना भाजपाला राबवायची आहे. हा हास्यास्पद प्रकार आहे, असे सपकाळ म्हणाले.

RSS जगातील सर्वात मोठी NGO! पंतप्रधान मोदींकडून कौतुकाचा वर्षाव, राजकीय वर्तुळात चर्चा

Comments are closed.