नव्याने भाजपवासी झालेल्या सुधाकर बडगुजरांचा महाजनांसमोरच सीमा हिरेंवर निशाणा, नेमकं काय घडलं?

सुधाकर बॅडगुझर: भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एक वेगळीच राजकीय झळाळी पाहायला मिळाली. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या प्रमुख उपस्थितीत MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. मात्र, या कार्यक्रमात सत्काराच्या तुलनेत सुधाकर बडगुजर यांच्या अप्रत्यक्ष टीकांनी आणि पक्षांतर्गत नाराजीच्या सूरांनी जास्त लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे (Seema Hiray) अनुपस्थित राहिल्या, यावरून बडगुजर यांनी नाव न घेता त्यांच्यावर रोखठोक टीका केली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाआधीच गिरीश महाजन एका दुसऱ्या कार्यक्रमाला (जो आमदार हिरे यांनी आयोजित केला होता) उपस्थित राहिले होते. त्यामुळे काहीसा उशीर झाल्याचं कारणही बडगुजर यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं.

सहनशील आहे म्हणून काही बोलत नव्हतो

सुधाकर बडगुजर म्हणाले, “मी खुर्ची टाकून बाहेर बसलो होतो, सहनशील आहे म्हणून काही बोलत नव्हतो. पण आज मला माहित होतं की कोणीतरी मुद्दाम उशीर करणारच आहे.” या वक्तव्यातून त्यांनी आमदार हिरे यांना टोला लगावल्याचे स्पष्ट जाणवले.

सीमा हिरेंवर निशाणा

ते पुढे म्हणाले, “आम्ही निवडणूक लढली, त्यांनीही लढली. आम्ही त्यांना ‘ताई’ म्हणतो. मागील निवडणुकीत तुमच्या सांगण्यावरून (गिरीश महाजन यांना उद्देशून) आम्ही त्यांना मदत केली होती. आज त्या इथे आल्या नाहीत, आल्या असत्या तर बरं वाटलं असतं.”

झाकली मूठ सव्वा लाखाची!

याच भाषणात बडगुजर यांनी इतर भाजप नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, “आपण माणसं मोठी केली, पण काही जण गेले. सतीश कुलकर्णी कधी महापौर झाले नसते, पण गिरीश महाजन मुळे झाले. आज काही लोक इथलं शेण खातात आणि दुसरीकडे गरळ ओकत आहेत. स्वतःचे हात भ्रष्टाचारात बरबटले आहेत. आम्ही तोंड उघडलं तर काय होईल माहीत नाही. झाकली मूठ सव्वा लाखाची!”

कोणी अंगावर आला तर शिंगावर घेणार

ते पुढे म्हणाले, “मी कोणाच्या वाट्याला जात नाही, पण कोणी अंगावर आला तर शिंगावर घेणार! भाऊ, तुम्ही सांगितलंत तर घेईन!” या वक्तव्यातून त्यांनी गिरीश महाजन यांच्याशी असलेल्या जवळिकेचा पुनरुच्चार केला, मात्र एकाच वेळी पक्षातील अंतर्गत विसंवादालाही वाचा फोडली.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Nashik Politics : नाशिकच्या भाजप कार्यकारिणीवर घराणेशाहीचा पगडा, सुधाकर बडगुजर, मामा राजवाडेंना डावललं!

आणखी वाचा

Comments are closed.