एमएस धोनी IPL मधून कधी घेणार निवृत्ती? सर्वात मोठ्या प्रश्नाचं खुद्द त्याने दिलं उत्तर! जाणून घ्या काय म्हणाला

इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा (IPL 2025) अंतिम सामना 3 जून रोजी खेळलं गेला. पण पाच वेळा IPL चं विजेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) संघ यंदा प्लेऑफपर्यंतही पोहोचू शकला नाही. स्पर्धेदरम्यान CSKचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) जखमी झाला आणि मग महेंद्रसिंग धोनीकडे (MS Dhoni) संघाची धुरा सोपवण्यात आली. मात्र IPL 2025 मध्ये कर्णधार बदलल्यानंतरही संघाच्या पराभवाची मालिका सुरूच राहिली.

IPL 2025 संपताच CSKसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला. पुढच्या हंगामात म्हणजेच IPL 2026 मध्ये एम.एस. धोनी खेळणार का? एका कार्यक्रमात धोनीला थेट विचारण्यात आलं की, तो पुढच्या हंगामात खेळणार आहे का? त्यावर माजी कर्णधार म्हणाला, मी खेळणार की नाही, हे ठरवण्यासाठी अजून बराच वेळ आहे. डिसेंबरच्या आसपास यावर विचार करण्याची वेळ येईल. तेवढ्यात कार्यक्रमातील एका व्यक्तीने मोठ्याने सांगितलं “You have to play sir” तुम्हाला अजून खेळावंच लागेल. यावर धोनी हसत म्हणाला, पण गुडघ्यात होणाऱ्या वेदनेची काळजी कोण घेणार?

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) IPL च्या 18व्या हंगामातही गुडघ्याच्या त्रासामुळे वेदनेत खेळताना दिसला. फलंदाजी करताना धावतानाही त्याला अडचण येत होती, ज्यामुळे गुडघ्याचा त्रास वाढला. पुढच्या हंगामाआधीही माहीला हाच विचार सतावत आहे की, त्याचा गुडघा क्रिकेट खेळताना साथ देईल का नाही. मात्र माहीचे चाहते त्याला पुन्हा एकदा मैदानावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments are closed.