चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जल्लोषाचा कधी न पाहिलेला VIDEO व्हायरल, ऋषभ पंतने केला शेअर

देशभरात शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ 159 दिवसांपूर्वी म्हणजेच 9 मार्च 2025 रोजीचा आहे. यात टीम इंडियातील सर्व खेळाडू दिसत आहेत. ऋषभ पंतच्या या पोस्टमुळे चाहत्यांना टीम इंडियाचा असा एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला, जो कदाचित कोणी आधी पाहिलाच नसेल. हा व्हिडिओ ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यानंतरचा आहे, ज्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. यात पंतला सहकाऱ्यांसोबत मनसोक्त मजा करताना पाहायला मिळते.

पंतने दाखवली विजयानंतरची झलक

दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर चार विकेट्सनी विजय मिळवला होता. सामना संपल्यानंतर खेळाडूंनी हा आनंद मोठ्या थाटात साजरा केला. पंतने हाच सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, इंडिया. काही क्षण कायम मनात कोरले जातात, आणि भारतासाठी मिळवलेला विजय ही त्यातील मोठी आठवण आहे. मला अभिमान आहे की मी भारतीय आहे.”

या व्हिडिओची सुरुवात टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून होते, जिथे जडेजाने विजयी धाव घेतली होती. त्यानंतर पंतला सर्व खेळाडूंसोबत मजा करताना पाहायला मिळते.

भारताचा ऐतिहासिक विजय

हा सामना 9 मार्च 2025 रोजी खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत 7 गडी गमावून 251 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एक षटक शिल्लक असताना हा सामना जिंकला. कर्णधार रोहित शर्माने शानदार 76 धावा केल्या, तर श्रेयस अय्यरने 48 धावांचे योगदान दिले. के.एल. राहुलने नाबाद 34 धावा करत विजय मिळवून दिला.

ऋषभ पंत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील एकही सामना खेळू शकला नव्हता. त्याची निवड बॅकअप विकेटकीपर म्हणून झाली होती. के.एल. राहुलच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पंतला संधी मिळाली नाही. मात्र, संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने अप्रतिम कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकली. लीग टप्प्यातील सर्व सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

हे ही वाचा –

VIDEO : रनआउटवरून भर मैदानात राडा! live सामन्यात पाकिस्तानी खेळाडूचा संयम सुटला, ओरडाओरड करत फेकली बॅट अन्…

आणखी वाचा

Comments are closed.