स्टीव स्मिथ पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या टी20 संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात! कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क
स्टीव्ह स्मिथ टी -20 संघ पुनरागमन: ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने या वर्षाच्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर वनडे फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. (Steve Smith retirement from ODIs) सध्या तो कसोटी आणि टी20 क्रिकेट खेळत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन टी20 संघात स्थान मिळवणे त्याच्यासाठी सध्या खूप कठीण दिसत आहे. अशा परिस्थितीत, स्मिथचे एक मोठे विधान समोर आले आहे, ज्यात त्याने लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Steve Smith Los Angeles 2028 Olympics)
2028च्या ऑलिम्पिक खेळांबद्दल स्काय स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत स्टीव्ह स्मिथ म्हणाला की, “2028च्या ऑलिम्पिक संघाचा भाग बनणे हे माझे एक लक्ष्य आहे. मला वाटते की सध्या ऑस्ट्रेलियन टी20 संघ खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्यात स्थान मिळवणे माझ्यासाठी सध्या खूप कठीण आहे, पण मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत राहीन आणि पुढे काय होते ते पाहू.” (Steve Smith Statement) विशेष म्हणजे, 2028 मध्ये ऑलिंपिक खेळ होतील तेव्हा स्टीव्ह स्मिथचे वय 39 वर्षे असेल.
ऑलिम्पिकमध्ये शेवटचे क्रिकेटचे सामने 1900 मध्ये आयोजित करण्यात आले होते, त्यानंतर 128 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने टी20 फॉरमॅटमध्ये खेळले जातील. (Cricket at Olympics after 128 years) याबद्दल स्टीव्ह स्मिथ पुढे म्हणाला, “मी लहानपणापासून अनेक ऑलिम्पिक पाहिले आहेत आणि ऑस्ट्रेलियन ॲथलीट्सना खेळताना पाहणे मला खूप आवडायचे. जेव्हा मला कळले की क्रिकेटचाही यात समावेश होणार आहे, तेव्हा मला त्यात सहभागी होणे खरोखरच खूप छान वाटेल.” (Steve Smith Statement)
Comments are closed.