दिग्गज क्रिकेटपटूचे 89व्या वर्षी निधन, संघाला मिळवून दिला होता पहिला विश्वचषक
ऑस्ट्रेलियन संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू बॉब सिम्पसन यांचे 89 व्या वर्षी निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातील ते सर्वाधिक प्रभावशाली खेळाडूंपैकी एक मानले जात. खेळाडू म्हणून मोठा ठसा उमटवल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाचे पूर्णवेळ प्रशिक्षक झाले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन क्रिकेटने नवे विक्रम प्रस्थापित केले.
1986 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. त्यावेळी बॉब सिम्पसन संघाशी जोडले गेले आणि मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघात आमूलाग्र बदल घडवला. त्यांनी कर्णधार अॅलन बॉर्डरसोबत कठोर मेहनत घेतली व डेव्हिड बून, डीन जोन्स, स्टीव्ह वॉ, क्रेग मॅकडरमॉट आणि मर्व ह्यूजेस यांसारख्या तरुण खेळाडूंना संघात स्थान दिले.
सिम्पसन यांनी 1986 मध्ये कोचिंगची जबाबदारी स्वीकारली आणि 1996 पर्यंत या भूमिकेत कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ऑस्ट्रेलियाने पहिला वनडे वर्ल्ड कप जिंकला. इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 1989 मध्ये त्यांनी अॅशेस मालिका जिंकून दाखवली.
खर्या क्रिकेट दंतकथेवर चीर.
एक कसोटी क्रिकेटपटू, कर्णधार, प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवडकर्ता – बॉब सिम्पसन ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील एक शक्तिशाली व्यक्ती होता, ज्याने आमच्या खेळाला सर्व काही दिले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉबच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल आपले विचार आणि सहानुभूती वाढविली आहे. pic.twitter.com/u8ygeznmcb
– क्रिकेट ऑस्ट्रेलिया (@क्रिकेटॉस) 16 ऑगस्ट, 2025
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने श्रद्धांजली अर्पण करत म्हटले आहे – “एक खरा क्रिकेट दिग्गज आमच्यातून गेला. त्यांनी संपूर्ण आयुष्य आमच्या खेळाला वाहून घेतले. बॉब यांच्या परिवारास व मित्रपरिवारास आमची मनःपूर्वक संवेदना.”
खेळाडू म्हणूनही बॉब सिम्पसन यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी 1957 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले व एकूण 62 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 4869 धावा केल्या ज्यात 10 शतकं व 27 अर्धशतकं समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सर्व शतकं त्यांनी कर्णधार असतानाच झळकावली. 1978 मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर तब्बल 21029 धावा नोंद आहेत.
Comments are closed.