रोहित-विराट नव्हे, तर ‘या’ सहकाऱ्याने केला होता इरफान पठाणचा घात, कॉमेंट्री पॅनलमधून हाकललं
इरफान पठाण आयपीएल भाष्य वर शांतता: आयपीएल 2025साठी सर्व तयारी पूर्ण झाली होती. काही दिवसांतच स्पर्धेची सुरुवात होणार होती. कमेंट्री पॅनेलमध्ये कोणते दिग्गज असतील याची यादीही ठरून गेली होती. मात्र, याच वेळी आयपीएलकडून अशी एक घोषणा करण्यात आली की ऐकून सर्वच जण थक्क झाले. ही घोषणा होती माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आयपीएल 2025 मध्ये कमेंट्री करणार नाहीत.
मैदानावर चमकदार कारकीर्द घडवलेल्या इरफान पठाण याने कमेंट्रीच्या जगातही आपली वेगळी छाप सोडली होती. त्याच्या दमदार विश्लेषणाला आणि सरळ बोलण्याला प्रेक्षकही पसंती देत होते. अशा वेळी अचानकच त्याला कमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आलं, हे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरलं.
यानंतर लगेचच या निर्णयामागचं कारणही उघड झालं. समजलं की टीम इंडियातील काही खेळाडू इरफान पठाणच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि टीकेमुळे नाराज आहेत. त्याच्या आग्रहावरूनच ब्रॉडकास्टरने त्याला कमेंट्री पॅनेलमधून बाहेर केल्याची चर्चा रंगली. मात्र, आता काही महिने उलटल्यानंतर इरफान पठाणने अखेर या वादावर मौन सोडलं आहे.
इरफान पठाण काय म्हणाला?
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या प्रकरणावर उघडपणे भूमिका मांडली. आयपीएलमधून वगळण्यामागे विराट कोहली आणि रोहित शर्मा असू शकतात, अशी चर्चा होती. आता तर हार्दिक पांड्याचे नावही समोर आले आहे. जरी इरफान पठाण यांनी कुणाचं नाव थेट घेतलं नाही, तरी माध्यमांमधील अहवालांनुसार हार्दिक पांड्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
इरफान पठाण म्हणाला की, “आयपीएलमध्ये 14 सामने होतात. त्यात जर मी सात सामन्यांमध्ये टीका केली असेल, तर तीही मी खूपच सौम्य ठेवली होती. तुम्ही 14 वेळा चुका केल्या, पण मी फक्त सात वेळाच बोललो. कारण ती माझी जबाबदारी आहे. टीका ही कामगिरीच्या आधारेच केली जाते.”
“मी नेहमीच सर्वांना आधार दिला आहे….”
तो पुढे म्हणाला की, “क्रिकेट खेळताना टीका होणं अपरिहार्य आहे. भारतातील महान खेळाडू सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांनाही टीका सहन करावी लागली होती. पण त्यांनी कधीच हे दाखवून दिलं नाही की ते खेळापेक्षा मोठे आहेत. त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे.”
मुलाखतीदरम्यान हार्दिक पंड्याबरोबरच्या नातेसंबंधांबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर इरफान पठाण यांनी उत्तर दिलं की, “आमच्यात कोणतीही स्पर्धा किंवा कटुता नाही. बडोद्याच्या क्रिकेटपटूंमध्ये असा एकही खेळाडू नसेल जो म्हणेल की इरफान आणि युसुफ पठाण यांनी आम्हाला साथ दिली नाही. दीपक हुड्डा असो किंवा हार्दिक-पांड्या बंधू. मी तर सुरुवातीच्या काळात सनरायझर्स संघासाठी हार्दिक पंड्याला शिफारसदेखील केली होती.”
आणखी वाचा
Comments are closed.