Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये पर्सनल स्पेस कशी द्याल?

एखादं नातं फुलण्यासाठी त्यात प्रेमासोबत हवा असतो तो विश्वास. त्यासोबत एकमेकांना समजून घेण्याची क्षमता असेल तर नात्यातील मर्यादा आपोआप राखल्या जातात. पण बऱ्याचदा नात्यातील सीमारेषा आपल्या लक्षात येत नाहीत. ज्यामुळे गैरसमज, दडपण आणि अस्वस्थता निर्माण होते. परिणामी नात्याचा करुण अंत होतो. असे तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आज आपण नातेसंबंधातील वैयक्तिक सीमारेषा कोणत्या? आणि त्या कशा ओळखाव्या? हे जाणून घेऊया. (Relationship Tips How to Give Personal Space to Partner without losing them )

1. नात्यातील गरजा

तुमचं नातं कितीही घट्ट असलं तरी त्याच्या गरजा पूर्ण होत नसतील तर ते टिकणं अवघड! नात्यात तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको? हे आधी समजून घ्या. नातं निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर त्यामध्ये भावनिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरील आवश्यकता विचारात घ्या.

2. मोकळा संवाद

तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या भावना स्पष्टपणे शेअर करा. ‘मला हे आवडत नाही’, ‘मला थोडावेळ एकटं राहूदे’ अशा वाक्यांमधून तुमची भूमिका स्पष्ट करा. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुम्हाला वैयक्तिक वेळ हवा असल्याचे समजेल.

3. स्पष्ट नकार

आपण बर्‍याचदा नातं टिकवण्यासाठी स्वतःवर त्याचं ओझं करून घेतो. एखादी गोष्ट आवडत नसेल तरी जोडीदार दुखावेल म्हणून ‘नाही’ म्हणायला घाबरतो. पण यामुळे तुमचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. परिणामी नाते संपुष्टात येते. त्यापेक्षा जिथे तुम्हाला नकार देणं गरजेचं वाटेल तिथे स्पष्ट ‘नाही’ म्हणायला शिका.

4. वेळ आणि अंतर

नातं टिकवायचं असेल तर एकमेकांना वेळ द्या. चिडचिड होत असेल तर वैयक्तिक स्पेस निवडा. अशावेळी एकत्र राहिल्याने कधी कधी नात्यातील ताण वाढू शिकतो. त्यामुळे आधी स्वतःला वेळ द्या, सुरुवातीला काही अंतर राखा आणि मग जोडीदारासोबत चर्चा करा.

5. आदर महत्वाचा

नात्यात मर्यादा राखण्यासोबत जोडीदाराच्या भावनांचा आदर करणेही तितकेच महत्वाचे असते. अनेकदा आपण आपल्याच भावनांच्या इतके प्रभावात असतो की, समोरच्याला काय वाटत असेल? याचा विचार करत नाही. ज्यामुळे नातं भावनिकदृष्ट्या कमकुवत होतं. म्हणून एकमेकांच्या भावना आणि निर्णयांचा आदर करा. जेणेकरून तुमचं नातं मजबूत राहील.

हेही वाचा –

Baby Health Tips: लहानमुलांना बाळगुटी देणं योग्य की अयोग्य?

Comments are closed.