डेवाल्ड ब्रेविसची वादळी खेळी! ऑस्ट्रेलियाविरूद्ध असा रेकाॅर्ड करणारा ठरला पहिला क्रिकेटर
देवाल्ड ब्रेव्हिस रेकॉर्ड: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली गेली आहे, ज्याचा तिसरा आणि अंतिम सामना केर्न्स येथे खेळला गेला. (South Africa vs Australia T20I) या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला आणि मालिका 2-1 अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 172 धावा केल्या. या सामन्यात डेवाल्ड ब्रेविसने 26 चेंडूत 1 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 53 धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान ब्रेविसने एक असा रेकाॅर्ड केला जो याआधी कोणालाही करता आला नाही. (Fastest 50 vs Australia T20I)
3 सामन्यांच्या या टी20 मालिकेत ब्रेविसने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली. तिसऱ्या सामन्यात ब्रेविसने 10व्या षटकात, जे आरोन हार्डीने टाकले होते, त्यात सलग 4 षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. यासोबतच डेवाल्ड ब्रेविस टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 चेंडूंमध्ये सलग 4 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. या मालिकेत ब्रेविसच्या बॅटमधून एकूण 14 षटकार पाहायला मिळाले. (4 sixes in an over T20I)
डेवाल्ड ब्रेविसने या सामन्यात केवळ 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, ज्यामुळे तो ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. या बाबतीत ब्रेविसने इंग्लंडचा माजी खेळाडू रवी बोपाराचा रेकाॅर्ड मोडला. बोपाराने 2014 मध्ये होबार्ट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 सामन्यात 23 चेंडूत अर्धशतक केले होते. (Dewald Brevis record)
Comments are closed.