यूएस-रशिया व्यापार वाढ
वृत्तसंस्था / मॉस्को
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही थांबलेले नसताना आणि अमेरिका हे युद्ध थांबविण्यासाठी रशियावर दबाव आणत असताना या दोन्ही देशांच्या व्यापारात मात्र वाढ झाली आहे. विशेषत: अमेरिकेत गेल्या जानेवारीत सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार अधिकच वाढला आहे, असे प्रतिपादन रशियाकडून करण्यात आले आहे. नुकतीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात अमेरिकेतील अलास्का येथे या युद्धासंबंधी चर्चा झाली आहे. ही चर्चा ‘सकारात्मक’ होती असे प्रतिपादन दोन्ही देशांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाकडून अमेरिकेशी व्यापार वाढल्याचे प्रतिपाद करण्यात आले असून ते अत्यंत महत्वाचे असल्याचे मानण्यात येत आहे.
अमेरिकेत ट्रंप यांची सत्ता आल्यानंतर दोन्ही देशांच्या परस्पर व्यापारात 20 टक्के वाढ झाली आहे. दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करु शकतात. व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधन या क्षेत्रांमध्ये अमेरिका आणि रशिया यांच्यात सातत्याने सहकार्य होत असून यापुढेही ते वाढणार आहे, असे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Comments are closed.