‘तुळशी’ ओव्हरफ्लो
पालिकेचा तुळशी तलाव शनिवारी (16 ऑगस्ट 2025) सायंकाळी 6.45 वाजता ओसंडून वाहू लागला. तुळशी तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 804.60 कोटी लिटर (8,046 दशलक्ष लिटर) इतकी आहे. हा तलाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असून महानगरपालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण संकुलापासून जवळच्या परिसरात आहे. गेल्या वर्षी हा तलाव 20 जुलै रोजी भरून वाहू लागला होता.
Comments are closed.