मराठी भाषा, संस्कृतीचा इतिहास देखाव्यातून साकारा; गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीचा गौरव आणखी द्विगुणित करण्यासाठी आणि मराठी भाषेचा समृद्ध वारसा वृद्धिंगत करण्यासाठी येत्या गणेशोत्सवात मराठी भाषा, मराठी संस्कृतीचा इतिहास गणेश मंडळांनी साकारावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.

यंदाच्या वर्षापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव असल्याची घोषणा सरकारने केली असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जाही देण्यात आला आहे. त्यामुळे भाषेची आणि उत्सवाची सांगड घालून मराठीचा जागर करण्याचे आवाहन समन्वय समितीने गणेश मंडळांना केले आहे. याबाबत समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यात नमूद केले आहे की, यंदा जास्तीत जास्त गणेश मंडळांनी मराठी भाषा मराठी संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास सामाजिक देखाव्यातून साकारावा. उत्सव काळात मंडळांनी सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीत, भजन यांना प्राधान्य देण्याचे आवाहनही समितीने केले आहे.

Comments are closed.