श्रुती हसन म्हणाली, मी हिरोईन आहे, मला जाऊ द्या!

‘कुली’ चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात श्रुती हसनसुद्धा आहे. चेन्नईत ‘कुली’ चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या श्रुती हसनला सुरक्षा रक्षकाने रोखले. तिला गाडीसोबत आतमध्ये जाऊ दिले जात नव्हते. सुरक्षा रक्षकाकडे पाहून श्रुती म्हणाली, ‘मी या चित्रपटात हिरोईन आहे. मला जाऊ द्या.’ श्रुतीचे हे वाक्य ऐकून तिच्यासोबत असलेले तिचे मित्र सर्वजण हसतात. हे सगळे ऐकल्यानंतर सुरक्षा रक्षक अखेर श्रुतीला आतमध्ये सोडतो, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘कुली’ चित्रपटात श्रुती हसनने रजनीकांतच्या मित्राच्या मुलीची भूमिका साकारली आहे. रजनीकांतसोबत श्रुतीने साकारलेल्या व्यक्तिरेखेचेही चांगलेच काwतुक होत आहे. ‘कुली’ चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 118.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लोकेश कनगराज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नागार्जुन आणि आमीर खान यांच्याही भूमिका आहेत.

Comments are closed.