अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज मायदेशी परतणार, लखनौला जंगी स्वागत होणार, पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता

हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळावरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पहिल्यांदा हिंदुस्थानात येत आहे. उद्या, रविवारी अमेरिकेहून मायदेशी परत येणार आहेत. अमेरिकेतून निघण्यापूर्वी शुभांशु यांनी विमान प्रवासातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. शुभांशु हे सर्वात आधी बंगळुरूला पोहोचतील. त्यानंतर ते लखनौला पोहोचू शकतात. शुभांशु हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेऊ शकतात. हिंदुस्थानात 22-23 ऑगस्टला होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिवस समारंभात सहभागी होण्यासाठी दिल्लीत पोहोचतील. शुंभाशु यांनी इन्स्टाग्रामवर विमानातील एक फोटोही शेअर केला आहे. शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी प्रशांत नायर यांनी ह्युस्टन येथील हिंदुस्थानी वाणिज्य दूतावासामध्ये साजऱया झालेल्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
शुभांशु शुक्ला यांनी एक पोस्ट शेअर केली असून यात म्हटले की, मायदेशी परतण्यासाठी विमानात चढत असताना, मी भारावून गेलो आहे. गेल्या वर्षभर या मोहिमेदरम्यान माझे मित्र आणि कुटुंब असलेल्या अद्भुत लोकांना मागे सोडून जाण्याचे मला दुःख आहे. या मोहिमेनंतर पहिल्यांदाच माझ्या सर्व मित्रांना, कुटुंबाला आणि देशातील लोकांना भेटण्यास मी उत्सुक आहे. मला वाटते, जीवन हेच आहे. एकाच वेळी. मोहिमेदरम्यान आणि नंतर सर्वांकडून अविश्वसनीय प्रेम आणि पाठिंबा मिळाल्यानंतर, मी तुम्हा सर्वांसोबत माझा अनुभव शेअर करण्यासाठी हिंदुस्थानात येत आहे. यूं ही चला चल राही… जीवन गाड़ी है समय पहिया…असे शुभांशुने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.