Dahi Handi 2025 : गोपाळकाल्यात फडणवीस-शिंदेंची राजकीय टोलेबाजी; मनपाची हंडी फोडू लोणी तुमच्यापर्यंत पोहोचवू

ठाणे – मुंबई आणि ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गोविंदाचे थरावर थर आज रचण्याचा थरथराट अवघा महाराष्ट्र पाहात आहे. कोकणनगर गोंविदा पथकाने आज दहा थर लावून विक्रम केला. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीला उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्यासोबत होते. गोपाळकाल्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजकीय टोलेबाजी करुन आगामी महानगर पालिका निवडणुकीची हंडी महायुतीच फोडेल असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांचा डोळा लोण्यावर आहे मात्र महायुतील मनपाची हंडे फोडेल आणि लोणी तुमच्यापर्यंत पोहोचवेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.

ठाण्यातील टेंभीनाका मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्रित उपस्थित राहून आगामी निवडणुक एकत्र लढण्याचे संकेत दिले. यंदा निवडणुकीची हंडी आपल्याला फोडायची आहे, काही जणांचे लक्ष त्यातील लोण्याच्या गोळ्यावर आहे, मात्र आम्ही महायुती म्हणून ही हंडी फोडून त्यातील लोणी तुमच्यापर्यंत पोहोचवू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
ठाण्यातील टेंभीनाका येथील हंडीसाठी दरवर्षी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो गोविंदा येतात
दहीहंडी खेळाचा लौकिक सातासमुद्रापलिकडे पोहोचला असून, स्पेनचे कॅसलर्स यंदा या सणात सहभागी होण्यासाठी मुंबईमध्ये आले
आज गोविंदाच्या सणाला अभिनेता गोविंदा इथे आले, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता गोविंदा यांचे स्वागत केले
धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही हंडी असून ठाणे नगरी ही गोविंदाची पंढरी मानली जाते, येथील दहीहंडीची परंपरा एकनाथ शिंदे यांनी तशीच सुरु ठेवली
पाकिस्तानची हंडी फोडत यंदा भारतीय लष्कराने पाकला त्यांची जागा दाखवली आहे. ‘इट का जवाब पत्थर से, गोली का जबाब गोलीसे’ दिला आहे. अमेरिकेत बसून बडबड करणाऱ्या आसिफ मुनीरला अद्दल घडवण्याची क्षमता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्करात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांनी टेंभीनाका मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीला उपस्थित राहून गोविदांचा उत्साह वाढवला
धर्मवीर सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका जिवंत करणारे प्रसाद ओक यांनी टेंभीनाका मित्र मंडळाच्या मानाच्या दहीहंडीला उपस्थित लावली
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर केलेले अभिनेते शरद केळकर यांनी देखील ठाण्यातील मानाच्या हंडीला भेट दिली

 

Comments are closed.