भारताच्या स्टार खेळाडूच्या घरी चोरी, कष्टाने कमावलेल्या पदकांसोबत पद्मश्री पुरस्कारही लंपास

भारतीय जलतरणकर्ता बुला चौधरी न्यूज: पश्चिम बंगालातील हुगली येथे भारताची प्रसिद्ध जलतरणपटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्या बुला चौधरी यांच्या घरी चोरी झाली. या चोरीत त्यांचा पद्मश्री पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार, अनेक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह विदेशी सन्मानही चोरट्यांनी लंपास केले. ही घटना देबाइपुकुर, हिंदमोटर परिसरातील त्यांच्या घरात घडली असून, या घरात चौथ्यांदा चोरी झाली आहे.

नेमकी चोरी झाली कशी?

मिळालेल्या माहितीनुसार, चोरांनी मागच्या दरवाजाचा कडीकुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि पुरस्कारांसह अनेक घरगुती वस्तू चोरीस नेल्या. आश्चर्याची बाब म्हणजे, चोरट्यांनी बाथरूममधील बेसिनचे नळ देखील उपसून नेले. या दरम्यान घरातील बरीच सामानाचे नुकसान झाले. सध्या बुला चौधरी सध्या तिच्या कुटुंबासह कोलकाता येथे राहते आणि वेळोवेळी तिच्या वडिलोपार्जित घरी येतात.

याआधीही 3 वेळा झाली चोरी…

घराची देखरेख त्यांचे भाऊ डोलन चौधरी करतात. ते आपल्या आजी-आजोबांसोबत या घरात राहतात. डोलन यांनी सांगितले की, याआधीही तीन वेळा चोरी झालेली असून प्रत्येक वेळी पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही घटनांना आळा बसलेला नाही. पूर्वी येथे एक पोलीस चौकी होती, मात्र तीही नंतर काढून टाकण्यात आली. त्यामुळे घर असुरक्षित झाले आहे.

घटनेनंतर उत्तरपाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमिताभ सन्याल यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे बुला चौधरींच्या कुटुंबाला असुरक्षित वाटत आहे. डोलन चौधरी यांनी हताशपणे प्रश्न उपस्थित केला. “आमच्या घरीच इतक्या वेळा चोरी होत असेल, तर सामान्य लोक कसे सुरक्षित राहणार?”

पोलिसांकडून तपास सुरू…

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही प्रचंड नाराजी आहे. कारण पूर्वीच्या चोऱ्यांमध्येही पोलिसांना गुन्हेगार सापडले नाहीत, ज्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. या चोऱ्यांमुळे केवळ किमती पुरस्कार आणि पदकेच नाहीत, तर देशासाठी अभिमानाने खेळलेल्या खेळाडूच्या आयुष्यभराच्या आठवणी व परिश्रमांचे प्रतीक हरवले आहेत.

सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, संशयितांकडून चौकशी सुरू आहे. बुला चौधरींचे कुटुंब आणि क्रीडाविश्व या घटनेमुळे व्यथित झाले असून, लवकरात लवकर चोरी गेलेले पुरस्कार परत मिळावेत, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

हे ही वाचा –

Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बोर्डाचा धक्कादायक निर्णय; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, जाणून घ्या A टू Z

आणखी वाचा

Comments are closed.