IND vs PAK हायव्होल्टेज सामना अन् पैशांचा पाऊस! जाहिरात दर ऐकून थक्क व्हाल, 10 सेकंदांची किंमत

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: आशिया कप 2025 चा येत्या 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आपला मोहीम 10 सप्टेंबरला युएईविरुद्धच्या सामन्याने सुरू करेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं असेल. दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाही, त्यामुळे जेव्हा कधी आयसीसी किंवा एसीसी स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने येतात, तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढते. यंदाही तीच परिस्थिती असून जाहिरातींच्या बाजारात या सामन्याला सर्वाधिक मागणी आहे.

ब्रॉडकास्टरसुद्धा या संधीचं सोनं करण्याच्या तयारीत आहेत. आशिया कप 2025 चे मीडिया हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाकडे आहेत. सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील, तर सोनी लिव्ह अ‍ॅपवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. अहवालानुसार ब्रॉडकास्टरने जाहिरातींचे दर जाहीर केले असून भारताच्या सामन्यांसाठी दर सर्वाधिक आहेत. त्यातही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सर्वाधिक डिमांड आहे.

आशिया कपमधील भारताच्या सामन्यांचे जाहिरात दर सर्वाधिक

भारताचे एशिया कपमध्ये सध्या 3 सामने निश्चित आहेत. मात्र भारत सुपर-4 मध्ये पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे. तसं झाल्यास सामने 6 होतील, आणि जर भारत अंतिम फेरीत गेला तर एकूण 7 सामने खेळले जातील. पाकिस्तानही सुपर-4 मध्ये पोहोचल्यास भारत-पाकिस्तानचा दुसरा सामना निश्चित होईल आणि जर अंतिम सामन्यात दोन्ही संघ भिडले, तर या स्पर्धेत भारत-पाकिस्तानची एकूण 3 सामने होतील.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, सोनी नेटवर्कने भारताच्या सामन्यांतील टीव्ही जाहिरातींचे दर प्रति 10 सेकंदासाठी तब्बल 14 ते 16 लाख रुपये ठेवले आहेत. म्हणजेच, कंपन्यांना भारत-पाकिस्तान सामन्यात आपले जाहिरात दाखवायची असल्यास मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. प्रेझेंटिंग स्पॉन्सरशिपसाठी 18 कोटी रुपये, तर असोसिएट स्पॉन्सरशिपसाठी 13 कोटी रुपये मोजावे लागतील.

डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेगळी डील

लाइव्ह स्ट्रीमिंग अ‍ॅपवर ‘को-प्रेझेंटिंग आणि हायलाइट्स पार्टनर’ होण्यासाठी प्रति कंपनी 30 कोटी रुपये, तर ‘को-पावर्ड बाय पॅकेज’साठी 18 कोटी रुपये आकारण्यात येत आहेत. डिजिटल जाहिरातींपैकी 30 टक्के जागा भारताच्या सामन्यांसाठी राखून ठेवण्यात आली आहे. आशिया कप 2025 ही स्पर्धा 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान युएईमध्ये रंगणार आहे. एकूण 8 संघांमध्ये 19 सामने खेळले जातील. ही स्पर्धा टी20 स्वरूपात होणार आहे. संघांना 4-4 अशा दोन गटात विभागण्यात आलं आहे.

  • गट अ : भारत, पाकिस्तान, ओमान, युएई
  • गट ब : अफगाणिस्तान, बांगलादेश, हाँगकाँग, श्रीलंका

हे ही वाचा –

Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बोर्डाचा धक्कादायक निर्णय; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, जाणून घ्या A टू Z

आणखी वाचा

Comments are closed.