जपमाळेत 108 मणीच का असतात?
हिंदू धर्मात नामस्मरण करण्याचे अद्भूत फायदे सांगण्यात आले आहेत. शरीराची इंद्रिये जागृत करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी जप करावा अवश्य करावा, असे सांगितले जाते. नामस्मरण किंवा मंत्राचा जप करण्यासाठी तुळस, स्फटिक, रत्न आणि रूद्राक्ष माळेचा वापर केला जातो. ही जपमाळ 108 मण्यांची असते. पण, 108 मणी का? 100, 50 अशी मण्यांची संख्या का नसते. आजच्या लेखातून जाणून घेऊयात मागील कारण काय आहे.
जपमाळेत 108 मणी असण्याविषयी अनेक गोष्टी प्रचलित आहेत. त्यापैंकी खाली देण्यात आल्यात.
- नक्षत्रांची संख्या 27 आहे आणि प्रत्येक नक्षत्रांचे 4 चरण असतात. त्यामुळे जेव्हा आपण 27 आणि 4 चा गुणाकार करता 108 ही संख्या येते. त्यामुळे जपमाळेत 108 मणी असल्याचे सांगितले जाते.
- ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे की, 12 राशी आणि 9 गृह यांचा गुणांक 108 आहे. हा आकडा संपूर्ण जगात घडणाऱ्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो, असे मानले जाते.
- याशिवाय असे ही सांगितले जाते की, जपमाळेतील 100 मणी स्वत:साठी तर उरलेले 8 मणी हे आपल्या गुरुचे असतात.
- प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात किमान 10800 वेळा देवांच नामस्मरण करावे असे अधात्म्य सांगते. पण, सध्याच्या धावपळीच्या रोजच्या रुटीनमध्ये हे अशक्य आहे. त्यामुळे 10800 दोन शुन्य वगळून 108 ही संख्या करण्यात आली आहे.
- 108 कण आणि सूर्याच्या चरणांमध्ये खोल संबंध आहे. सूर्य एका वर्षात 216000 टप्पे बदलतो आणि वर्षातून दोनदा त्याची स्थिती देखील बदलतो. यामुळे उत्तरयण आणि दक्षिणायन सहा महिने टिकते. त्यामुळे सूर्य 6 महिन्यांत 108000 वेळा स्थिती बदलतो. याच आधारावर 3 शून्य काढून 108 संख्या जपमाळेत दिसून येते.
हेही पाहा –
Comments are closed.