Asia Cup 2025: बाबर-रिझवानचे टी-20 करिअर संपणार? या 3 कारणांमुळे झाली संघातून हकालपट्टी
आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सलमान आघा यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यात आले आहे. बाबर-रिझवानशिवाय पाकिस्तानच्या संघात अनुभवाची कमतरता स्पष्टपणे जाणवते.
मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या दोन्ही फलंदाजांची खराब फॉर्म आणि निष्कृष्ट आकडेवारी त्यांच्या विरोधात गेली आहे. अशा परिस्थितीत, किमान टी-20 फॉरमॅटमध्ये तरी या दोघांच्या कारकिर्दीचा उतरता टप्पा सुरू झाला आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या तीन कारणांमुळे सिलेक्टर्सनी बाबर-रिझवानवर गाजावाजा केला आहे.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची अलीकडील फॉर्म त्यांच्या विरोधात गेली आहे. 2024 मध्ये बाबरने एकूण 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यातून त्याच्या बॅटमधून 738 धावा आल्या. बाबरने या 738 धावा 133 च्या स्ट्राईक रेटने केल्या. तर दुसरीकडे, रिझवानने 21 सामन्यांत 619 धावा जमवल्या, पण त्याचा स्ट्राईक रेट केवळ 117 इतकाच राहिला.
टी-20 फॉरमॅटमध्ये सध्या जेव्हा फलंदाज जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा कुटत आहेत, तेव्हा 133 आणि 117 च्या स्ट्राईक रेट असलेल्या फलंदाजांना सिलेक्टर्स संघात कशी काय संधी देणार?
विशेष म्हणजे बाबर आझम टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा असते की तो पॉवरप्लेमध्ये आक्रमक शैलीत फटकेबाजी करेल. मात्र, बाबर या अपेक्षांवर अजिबात खरे उतरलेला नाही. बाबरच्या संथ फलंदाजीमुळे पाकिस्तानचा संघ सुरुवातीच्या सहा षटकांचा फायदा उठवण्यात अपयशी ठरतो. अगदी असाच काहीसा अनुभव रिझवानच्या बाबतीतही आला आहे.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे सिलेक्टर्स आता तरुण खेळाडूंना भविष्यासाठी तयार करू इच्छित आहेत. ह्याच कारणामुळे या दोन्ही फलंदाजांना टी-20 संघाबाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सिलेक्टर्स कदाचित टी-20 मध्ये बाबर आणि रिझवानच्या पुढे पाहू इच्छित आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
Comments are closed.