पुरुषांसाठी हे आहेत उत्तम कलर कॉम्बिनेशन

पुरुषांच्या कपड्यांच्या ऑप्शनबद्दल बोलायचं झालं तर ते फारच लिमिटेड असतात. त्यामुळे अनेक पुरुषमंडळींचा कुठेही बाहेर जाताना कलर कॉम्बिनेशन निवडताना गोंधळ उडतो. तुमच्याही बाबतीत असं काहीस घडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकांना असा समज असतो की, स्मार्ट, रॉयल लूकसाठी महागड्या आफटफिट्सची गरज असते. पण, हे पूर्णत: चुकीचे आहे. तुम्ही जर कोणतेही कपडे स्मार्ट पद्धतीने कॅरी केलेत तर तुमचा लूक नक्कीच वाढवू शकता. आज आपण असे काही कलर कॉम्बिनेशन पाहणार आहोत, ज्यामुळे तुमचा लूक नक्कीच अट्राक्टिव्ह होऊ शकतो.

काळा आणि पांढरा –

काळा आणि पांढऱ्या रंगाचे कॉम्बिनेशन फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही लूकसाठी उत्तम आहेत. या कलर कॉम्बिनेशनसोबत काळ्या रंगाचे शुज लूकमध्ये अधिक छान दिसतात.

ओनियन पिंक आणि ब्लँक पँट –

हल्ली लाईट कलरचे कपडे घालण्याला अधिक पसंती दिली जाते. काळ्या रंगाच्या पँटसोबत ओनियन पिंक शर्ट तुम्हाला क्लासी लूक देतो.

व्हाईट शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन पँट –

व्हाईट शर्ट आणि ऑलिव्ह ग्रीन पँटचे कॉम्बिनेशन कॅज्युअल लूकसाठी उत्तम पर्याय आहे.

लाल आणि पांढरा –

जर तुमच्याकडे लाल शर्टं आहे आणि त्यासोबत कोणती पँट घालायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर पांढरी पँट घालावी. हे कलर कॉम्बिनेशन उत्तम पर्याय आहे.

डार्क ब्लू शर्ट आणि ब्लँक पँट –

ब्लू शेडचा एकतरी शर्ट पुरुषांच्या कपाटात असतो. तुम्ही डार्क रंगाच्या ब्लू शेडसोबत ब्लँक कलरची पँट वेअर करून क्लासी आणि अट्राक्टिव्ह लूक मिळवू शकता.

लाईट ब्लू शर्ट आणि बेज पँट –

लाईट ब्लू शर्ट आणि बेज पँट ऑफिस वेअरसाठी उत्तम पर्याय आहे. हे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला रॉयल लूक देऊ शकतो.

 

हेही पाहा –

Comments are closed.