IPL 2026 : CSK नव्हे, या चॅम्पियन संघात खेळू शकतो संजू सॅमसन! आगामी सिझनपूर्वी मोठी चर्चा सुरू

आयपीएल 2026 च्या सुरुवातीला अजून साधारण 7 महिने बाकी आहेत. मात्र आगामी हंगामापूर्वी अनेक मोठे बदल घडणार आहेत. संजू सॅमसनदेखील (Sanju Samson) राजस्थान रॉयल्स (Rajasthan royals) सोडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे अशी चर्चा रंगली होती की तो सीएसकेमध्ये (CSK) सामील होऊ शकतो. पण आता संजूच्या कहाणीला नवा वळण मिळालं आहे. खरं तर, केकेआर (KKR) संजूला आपल्या संघाचा भाग बनवू शकते. कारण केकेआरला एका चांगल्या कॅप्टनसोबतच एक उत्तम विकेटकीपरची गरज आहे.

आयपीएल 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas iyer) नेतृत्वाखाली केकेआरने विजेतेपद पटकावलं होतं. पण त्याला आयपीएल 2025 (IPL 2025) साठी रिटेन केलं नव्हतं. त्यामुळे आता केकेआरला एका अनुभवी कर्णधार पदाची गरज आहे आणि त्या दृष्टीने संजू सॅमसनचे नाव चर्चेत आहे.

संजू सॅमसनच्या (Sanju Samson) आयपीएल करिअरकडे पाहिल्यास, तो राजस्थान रॉयल्ससाठी (RR) सातत्याने खेळत आला आहे आणि अनेकदा संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याचा स्ट्राईक रेट, नेतृत्वगुण आणि अनुभव यामुळे तो कोणत्याही मोठ्या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. केकेआरने जर त्याला आपल्या संघात घेतले, तर केवळ कॅप्टनसीच नव्हे तर मिडल ऑर्डरमध्येही संघ मजबूत होऊ शकेल. त्यामुळे आगामी हंगामात सॅमसनचा ट्रान्स्फर हा चाहत्यांसाठी मोठा धक्का आणि तितकीच उत्सुकता निर्माण करणारा ठरू शकतो.

Comments are closed.