किती महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करावी?

आपल्या आयुष्यात डोळे किती मोलाचे आहे हे आपण सर्वांना माहीत आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. डोळे शरीराचा नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्यांची नियमित तपासणी करावी, असे तज्ज्ञमंडळी सांगतात. सर्वसाधारणपणे, दर दोन वर्षांनी डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक मानले जाते. पण, तुम्हाला जर डोळ्यांसंबंधित काही समस्या वारंवार उद्भवत असतील तर योग्य वेळेला डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. आज आपण वयोगटानुसार किती दिवसांनी डोळ्यांची तपासणी गरजेची आहे, हे पाहूयात.

  • लहान मुलांच्या वयाच्या 6 व्या महिन्यात डोळ्यांची तपासणी करावी, असे तज्ज्ञ सांगतात.
  • यानंतर तुम्ही लहान मुलं 3 वर्षांचे झाल्यावर डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे असते.
  • मुलं 6 वर्षांचे झाल्यावर त्यांची दरवर्षी तपासणी करावी. असे नेत्रतज्ज्ञ सांगतात.
  • 18 ते 40 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तीने वर्षांतून एकदा डोळ्यांची तपासणी करावी.
  • जर तुम्हाला अचानक अस्पष्ट, धुसर दिसत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करावा आणि योग्य ते उपचार करण्यास सुरुवात करावी.
  • 70 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास दर 6 महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करावी.
  • जर तुमच्या कुटूंबात डोळ्यांच्या आजारांचा इतिहास असेल, काचबिंदू किंवा मोतीबिंदू असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करावी.
  • ज्यांना चष्मा आहे अशा व्यक्तींनी नियमित तपासणी करून दृष्टी योग्य आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.

ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेट द्यावी

  • अस्पष्ट किंवा दृष्टी कमी होणे.
  • डोळ्यांमध्ये जळजळ
  • सतत डोकेदुखी.
  • डोळ्यांच्या आत लाल होणे.

 

हेही पाहा –

Comments are closed.