मराठवाड्यात पावसाचा कहर; मुक्रमाबाद येथे अनेक गावांचा संपर्क तुटला, NDRF जवानांना पाचारण, मदत कार्य सुरू

रविवारी मध्यरात्री ढगफुटी होऊन पाच तास मुक्रमाबाद सह परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे तर केंद्री, लेंडी, तेरू या नद्यांना महापूर येऊन धोक्याच्या पातळीने वाहत असल्याने या पुराचे पाणी मुक्रमाबाद येथील जुन्या गावठाणातील घरात पाणी शिरल्याने प्रशासनाने रातोरात कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तर धडकनाळ येथील पुलावर अचानक आलेल्या पुरात दोन कारा व एक अँटो वाहुन गेला. तर यात अनेक जण बेपत्ता असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून मुक्रमाबादसह सर्वदुर दमदार पाऊस सुरू असताना पुन्हा एकदा रविवारी मध्यरात्री ढगफुटी होऊन अंदाजे पाच तास मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने केंद्री, लेंडी, तेरू या नद्यांना महापूर येऊन या पुराचे पाणी शेकडो एकर जमिनीत शिरून मातीसह पिके खरडून जाऊन प्रचंड नुकसान झालेले पाहून शेतकऱ्यांचे डोळे पानावले आहेत.

लेंडी नदीच्या पुराचे पाणी मुक्रमाबाद जुन्या गावठानातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रशासनाने या कुटुंबाना रातोरात सुरक्षित ठिकाणी हालविले आहे. तर लेंडीला आलेल्या महापुराच्या पाण्याने मुक्रमाबाद येथील बालाजी खंकरे यांच्या दोन शेडसह २२ म्हशी पुरात वाहून गेल्यामुळे अंदाजे ८० लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. तर परतपूर येथील नरसिंह पाटील यांचे तीन म्हशी व रावी येथील रामचंद्र श्रीरामे या शेतकऱ्याच्या दोन म्हशी व दोन शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

खतगाव, देगाव, बावलगाव येथील एकाच पावसाने पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. बामणी मुक्रमाबाद या मार्गावरील लेंडी नदीवरील पुल पुराच्या पाण्याने पूर्ण वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क मुक्रमाबाद शी तुटला आहे. लेंडी धरणाचे गळभरणीचे काम पूर्ण झाल्यामुळे नद्यांना महापूर येऊन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे धरणातील पाण्याच्या बँक वॉटर मध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावात घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सपोनी राजेश चव्हाण यांनी केले आहे. पूर परिस्थितीवर जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार राजेश जाधव हे लक्ष ठेवून एन.डी.आर.एफ जवानांना पाचारण करून रावनगाव, हसनाळ येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यु करून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी जवाना कडून मदत कार्य सुरू आहे.

देगलूर-मुक्रमाबाद-राणापुर या राष्ट्रीय महामार्गावरील लखमापूर कमान, केंद्री नदी,धडकनाळ या पुलावरून धोक्याच्या पातळीने पुराचे पाणी वाहत असल्याने रात्रभर आज दिवसभर प्रवासी वाहतूक खोळबंली जाणार आहे. या राष्ट्रीय महार्गावर सपोनी राजेश चव्हाण यांनी पोलीस बंदोबस्त ठेवले आहेत. या ढगफुटी मुसळधार पावसामुळेर शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच संकटात असताना पिकविमा कंपनी पिकविम्या पासून वंचित ठेवल्यामुळे तात्काळ कृषी व महसुल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. ढगफुटी मुळे पिंकाचे झालेले अतोनात नुकसानीने शेतकऱ्यांचे कबंरडेच मोडले आहे.

Comments are closed.